इलेक्ट्रीक मोटार चोरणारे आरोपी जेरबंद. ………..,…. राजुर ‘पोलीसांची दमदार कामगीरी

. ………..,….
विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
राजुर येथील सोमनाथ विठ्ठल वालझाडे यांच्या शेतातील विहीरीवरुन दोन इलेक्ट्रीक मोटार चोरीला गेले होते. त्याबाबत फिर्यादी सोमनाथ विठ्ठल वालझाडे यांनी राजुर पोलीस स्टेशन येथे इलेक्ट्री मोटार चोरी गेले बाबत तक्रार दिली त्यावरून राजुर पोलीस स्टेशनला गु.र.नं 180/2023 भा. द. वी कलम 379 प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला
सा. पो. नि गणेश इंगळे यांना गोपनिय बातमी द्वारामार्फत माहीती मिळाली की, सदर इलेक्ट्रीक मोटरी इसम नामे भालचंद किसन भांगरे, रा. राजुर, यांने चोरले बाबत माहीती मिळाली सदर माहीती तसेच तांत्रीक विशलेषन करुन सदर चा गुन्हा हा भालचंद किसन भांगरे वय 33 रा. राजूर यांनी केल्या बाबत खात्री झाल्याने यास चौकशी कामी ताब्यात घेवुन त्यास सदर घटने बाबत सखोल चौकशी केली असता सुरुवातील त्याने उडवाउडवी ची उत्तरे दिली त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेतले असता त्यांने त्यांच्या साथीदारच्या मदतीने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने त्याचे साथीदार प्रविण लक्ष्मण शेळके, रा. भोजदरावाडी, ता. अकोले व मिलींद तान्हाजी म्हशाळ, रा. भोजदरावाडी, ता. अकोले यांना ताब्यात घेतले आहे त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असुन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करुन गुन्ह्याचा पुढील तपास करत आहॆत . सदर आरोपी यांच्याकडुन गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल व सिंगल फेजची इलेक्ट्रीक मोटार असा एकुन 44,000/- रुपये मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अ.नगर, श्रीमती स्वाती भोर मॅडम- अपर पोलीस अधिक्षक, मा. सोमनाथ वाघचौरे, उपविभागिय पोलीस अधिकारी, संगमनेर यांचे मार्गदर्शनाखाली, सा. पो. नि गणेश इंगळे, पो. उपनिरीक्षक जी.एफ शेख, पो.ना रोहिणी वाडेकर, चा.पो.ना तांबे, पो कॉ. अशोक गाढे, पो कॉ विजय फटांगरे, पो कॉ सुनिल ढाकणे, तसेच अपर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपुर येथील पो ना सचिन धनाट, पो कॉ / प्रमोद जाधव यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास म.पो.ना रोहिणी वाडेकर हे करत आहेत.