इतर

सर्वोच्च न्यायालयाच्या पेन्शन व अंमलबजावणी निर्णया बाबत भारतीय मजदूर संघाचा परिसंवाद संपन्न!


पुणे प्रतिनिधी
पेंन्शन संदर्भातील मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया चा कामगारांना होणारा लाभ, कामगारांच्या शंका समाधान व निर्णय जास्तीत जास्त कामगारां पर्यंत पोहचवण्यासाठी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने भविष्य निर्वाह निधी आयुक्त , व्यवस्थापन सल्लागार, प्रतिनिधी व विविध ऊद्योगातील प्रशासन अधिकारी, संघटना पदाधिकारी व पेंन्शन धारक
यांच्या उपस्थितीत परिसंवाद सम्पन्न झाला
या वेळी मा सूरज पाटील क्षेत्रीय आयुक्त भविष्य निर्वाह निधी कार्यालय पुणे यांनी मा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णया नुसार सन 2014 पुर्वी सेवा निवृत्त झालेल्या व सध्या सेवेत असलेल्या ज्या कामगारांचे अंशदान रक्कम प्रत्यक्ष वेतन (बेसीक + महागाई भत्ता) प्रमाणे वजावट करून पी फ कार्यालय मध्ये जमा केला आहे. अशा पात्र कामगारांनी या विकल्पा चा लाभ घ्यावा. व 3मे 2023 पुर्वी ऑनलाईन/ ऑफ लाईन पेंन्शन विकल्पा चा फार्म पी फ कार्यालय मध्ये जमा करावे असे मनोगत व्यक्त केले आहे.
व्यवस्थापन सल्लागार अॅड प्रभाकर धारिया यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची सविस्तर माहिती देवुन पात्र सभासद जर मृत्यू झालेला असेल तर त्यांच्या वारसांनी ही पेंन्शन विकल्पा चा लाभ घ्यावा व संघटनेच्या माध्यमातून पेंन्शन संदर्भातील निर्णया माहिती जास्तीत जास्त कामगारांना करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे . तसेच विविध व्यवस्थापनाच्या फोरम वर सुध्दा बाबतीत माहिती दिली आहे. तसेच सविस्तर माहिती विविध आस्थापने मध्ये लेखी स्वरुपात नोटीस व्दारे जनजागृती करत आहोत असे मनोगत व्यक्त केले आहे.

भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून अॅड ऊमेश विस्वाद यांनी मनोगत व्यक्त करताना कार्यरत व निवृत्त कर्मचारी यांच्या मध्ये अनेक गैरसमज, शंका, अनिश्चितता होती यामुळे भविष्य निर्वाह निधी अधिकारी, व्यवस्थापन, व कामगार प्रतिनिधी त्रिपक्षीय सेमिनार आयोजित करून मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी, तसेच पेंन्शन चे सूत्र सर्व कामगारां करिता सारखे असावे, सोपे व सहज समजेल असें असावे, कोशीयारी समिती च्या पेंन्शन संदर्भातील आवहाल स्विकारून तरतूदी लागु कराव्यात असे मनोगत भामसंघ चे प्रतिनिधी ऊमेश विस्वाद यांनी व्यक्त केली आहे.

समारोप प्रसंगी भारतीय मजदूर संघ प्रदेश अध्यक्ष अॅड अनिल ढुमणे यांनी कामगारांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा काळजी पुर्वक अभ्यास करून पेंन्शन विकल्पा चा निर्णय करावे तसेच पेंन्शन विकल्पा बाबतीत सहा महिने ची मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली होती त्यामुळे याची मुदत 3 मे 2023 पर्यंत वाढविले आहे. पुढील काळात भारतीय मजदूर संघ पेंन्शन ही बदलत्या महागाई भत्ता सकट मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे मनोमन समारोप प्रसंगी केलं आहे.
या परिसंवादाचे उद्घाटन श्री सुरज पाटील क्षेत्रीय आयुक्त भविष्य निर्वाह निधी पुणे पुणे, व्यवस्थापन सल्लागार अॅड प्रभाकर धारिया, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड अनिल ढुमणे, भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, सचिव बाळासाहेब भुजबळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. परिसंवादाचे सुत्रसंचालन बाळासाहेब भुजबळ व आभार प्रदर्शन अर्जुन चव्हाण यांनी केले आहे. राष्ट्रगीताने परिसंवाद चा समारोप करण्यात आला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button