अरविंद गाडेकर ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड अवॉर्डने सन्मानित!

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद अरविंद गाडेकर यांना ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड अवॉर्ड’ या इंटरनॅशनल अवॉर्डने मुंबई येथे दिमाखदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले आहे.
अरविंद गाडेकर यांनी नुकतीच बारा हजार दोनशे व्यंगचित्र साकारले आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल आणि व्यंगचित्र व्यंगचित्रकारिता क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर ग्लोबल बुक ऑफ एक्सेलन्स इंग्लंड या संस्थेचे अध्यक्ष मनीष कुमार ‘ तारक मेहता का उल्टा चश्मा’ या सिरीयलचे निर्माते दिग्दर्शक अशीद मोदी आणि अभिनेता जेठालाल ( दिलीप जोशी ), प्रसिद्ध मिमिक्री एक्टर सुनील पाल, शिवानी शर्मा (अभिनेत्री फॅशन मॉडेल), अंजली साखरे (अभिनेत्री), अवनी जोशी( अभिनेत्री संगीत निर्देशक आणि गीतकार) आणि महाराष्ट्रातील अनेक उद्योजक,सामाजिक क्षेत्रात काम करणारे समाजसेवक, मान्यवर उपस्थित होते.

इंग्लंड येथील या संस्थेचे अध्यक्ष मनीष कुमार यांनी या दिमागदार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी या संस्थेचे Brand Ambessadar डॉ. हेमराज शहा उपस्थित होते. यावेळी देशभरातून देशभरातील अनेक राज्यातून जवळजवळ 80 पुरस्कार्थी यावेळी उपस्थित होते.या ग्लोबलअवॉर्ड बद्दल सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.