जायनावाडी येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा.

अकोले/प्रतिनिधी –
अकोले तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जायनावाडी बिताका या दुर्गम भागातील गावात दिंनाक ६ जून रोजी शासनाकडील आदेशानुसार शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वातंत्र्याचा महासागर निर्माण करणारे रयतेचे प्रेरणास्थान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ” शिवराज्याभिषेक सोहळा ” दरवर्षी ६ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन , ग्रामविकास विभागाकडील आदेशानुसार ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ” शिवस्वराज्य दिन ” म्हणून साजरा करण्याबाबत आदेशीय करण्यात आलेले आहे. या निमित्ताने ग्रामपंचायत जायनावाडी बिताका येथे ” शिवस्वराज्य दिन ” विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करुन भगवा स्वराज्यध्वज , शिवशक राजदंड स्वराज्यगुढीवर पुष्पहार,आंब्याची डहाळी बांधुन शिवराज्याच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभी करण्यात आली.
याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य बाजीराव भांगरे, ग्रामसेवक बापूसाहेब राजळे, केंद्रचालक बाळू मेंगाळ, ग्रामपंचायत शिपाई निवृत्ती भांगरे,सोमनाथ भांगरे,लक्ष्मण भांगरे, अनिता भांगरे,यशोदा भांगरे, व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.