रोटरी ‘कायदेमंथन’मध्ये कायदेतज्ज्ञांचे मार्गदर्शन

नाशिक : नागरिकांच्या जीवनाशी निगडित वेगवेगळ्या कायद्यांविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना त्यांची माहिती व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने ‘कायदेमंथन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. या कार्यक्रमांतर्गत ‘स्थावर मालमत्ता विकत घेतांना घ्यावयाची काळजी’ या विषयावरील व्याख्यानाचे रोटरी क्लबच्या गंजमाळ येथील सभागृहात नुकतेच आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रॉपर्टी कन्सल्टंट राज तलरेजा आणि ख्यातनाम बांधकाम व्यवसायिक ऋषिकेश समनवार यांनी अॅड. विद्युल्लता तातेड आणि अॅड. राजेश्वरी बालाजीवाले यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
स्थावर मिळकत कोणकोणत्या पद्धतीने हस्तांतरित करता येते? मिळकत हस्तांतरित करण्याच्या कायदेशीर प्रक्रिया कोणत्या? मिळकतीसंबंधीचे करार करतांना भारतीय करार कायद्याच्या कोणकोणत्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत? मिळकती संबंधीच्या दस्तांची नोंदणी करण्याची आवश्यकता व त्या संबंधीची कार्यपद्धती कोणती? स्थावर मालमत्ता खरेदी करतांना कोणती काळजी घेण्याची आवश्यकता आहे? तसेच टायटल रिपोर्ट आणि त्याचे महत्त्व कोणते? याविषयी विचारलेल्या प्रश्नांना अॅड. विद्युल्लता तातेड आणि अॅड. राजेश्वरी बालाजीवाले यांनी समाधानकारक उत्तरे दिली. तसेच नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.
परस्पर संवादाच्या कार्यक्रमात मंगेश अपशंकर, डॉ. रामनाथ जगताप, अक्षय येवले, दिनेश शर्मा, सुदीप छाजेड आणि धर्मेश पोरिया यांची मुलाखत सुरेखा रजपूत यांनी घेतली. या कार्यक्रमास रोटरीचे अध्यक्ष प्रफुल बरडिया, सेक्रेटरी ओम प्रकाश रावत तसेच कार्यक्रम समन्वयक शिल्पा पारख, डॉ. अक्षता बुरड, रागिनी कुलकर्णी, सतीश मंडोरा, उर्मी दिनानी आदी उपस्थित होते.
………………………………
.