इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि. ५/०९/२०२२

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १४ शके १९४४
दिनांक :- ०५/०९/२०२२,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३९,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- नवमी समाप्ति ०८:२८, दशमी २९:५५,
नक्षत्र :- मूळ समाप्ति २०:०६,
योग :- प्रीति समाप्ति ११:२७,
करण :- तैतिल समाप्ति १९:१४,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पुर्वा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयदिन वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०७:४९ ते ०९:२२ पर्यंत,

लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:१६ ते ०७:४९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२२ ते १०:५५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३३ ते ०५:०६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:०६ ते ०६:३९ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
अदु:ख नवमी, गौरी विसर्जन २०:०६ प., दग्ध २९:५५ नं., दोरे घेणे,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १४ शके १९४४
दिनांक = ०५/०९/२०२२
वार = इंदुवासरे(सोमवार)

मेष
खर्चावर नियंत्रण ठेवावे. घरातील वातावरण आनंदी राहील. आततायीपणा करू नये. प्रयत्नांची कास सोडू नये. मनावर कोणताही ताण घेऊ नये.

वृषभ
कामात चांगली प्रगती करता येईल. व्यावसायिक ठिकाणी काही लक्षात ठेवण्याजोगे अनुभव येतील. ग्रहांचा चांगला पाठिंबा मिळेल. मेहनतीला मागे हटु नका. आखलेल्या योजनांवर भर द्या.

मिथुन
मित्रांचा विचित्र अनुभव येऊ शकतो. कौटुंबिक चर्चेत आक्रमक होऊ नका. कौटुंबिक स्थिती संयमाने हाताळा. हित शत्रूंवर लक्ष ठेवा. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

कर्क
भागीदारीचा निर्णय विचारपूर्वक करा. अंगीभूत कलागुणांना वाव मिळेल. नवीन ओळखी वाढतील. प्रेमाला उत्तम साथ मिळेल. ओळखीचे मैत्रीत रूपांतर होईल.

सिंह
जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कामातील समस्या सोडवता येतील. मनात अनामिक भीती दाटून येईल. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल.

कन्या
घरात आनंदी वातावरण राहील. व्यवसाय पुन्हा मूळ पदावर येईल. आर्थिक गणिते सुधारतील. योजनेला मूर्त रूप द्याल. विरोधकांकडे लक्ष ठेवा.

तूळ
घरातील मोठ्यांचा आशीर्वाद पाठीशी ठेवा. कामात असताना इतरत्र लक्ष देऊ नका. एखादी घटना मन खिन्न करू शकते. विरोधक नरमाईने घेतील. हातातील काम पूर्ण होईल.

वृश्चिक
लहान प्रवास घडेल. किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. पराक्रमात वाढ होईल. दिनक्रम व्यस्त राहील. भेटवस्तू मिळण्याची शक्यता.

धनू
जोडीदाराशी सुसंवाद घडेल. कौटुंबिक गैरसमज टाळा. शिक्षण, स्पर्धेत यश मिळेल. बचतीच्या योजना आखाव्यात. मुलांचा उत्साह वाढीस लागेल.

मकर
व्यावसायिक संधी लक्षात घ्याव्यात. व्यायामाचा आळस करू नका. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मित्रांची भेट मन प्रसन्न करेल. निष्काळजीपणा करू नका.

कुंभ
चांगले मनोरंजन घडेल. कोर्टाची कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीतील प्रयत्न यश देतील. चुगलखोर व्यक्तींकडे दुर्लक्ष करावे. कामाची दिवसभर धावपळ राहील.

मीन
कामातील उत्साह व धडाडी वाढेल. जुने मित्र भेटतील. वाहन चालवताना काळजी घ्या. बोलण्यात सौम्यता बाळगा. खर्चाला आवर घाला.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button