बौद्ध धम्म संस्कार संघ श्रा वस्ती विहार सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

डॉ. शाम जाधव
बौद्ध धम्म संस्कार संघ श्रा वस्ती विहार सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३७६ वी जयंती जयंती साजरी करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून विलींग्डन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर संपत गायकवाड हे उपस्थित होते.
सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची धूप दीप पुष्प यांनी प्रमुख पाहुणे डॉ संपतराव गायकवाड यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.
विहाराचे सह खजिनदार जगन्नाथ आठवले यांनी थोडक्यात प्रास्ताविक केले. त्यानंतर पाहुण्यांची ओळख आणि परिचय विहाराच्या संचालिका आयुष्यमती अवंतिका वाघमारे यांनी करून दिली.

छत्रपती शिवाजी महाराज हे सोळाव्या शतकातील महान राजे होते, या कालखंडामध्ये त्यांनी देशाचा जवळपास दक्षिण ते उत्तरेचा प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन भू भाग व्यापलेला होता. कर्नाटक राज्याची चार ते पाच छकले झाली होती, मराठा सरदारांना पैकी बाकी कोणी राजा नव्हता.
वाङ्ममयाचा मी प्राध्यापक असल्यामुळे पुरंदरे पासून ते राहुल सोलापुरकर पर्यंत टीका टिप्पणी करण्याची मजल गेली आहे.
भारतात इंग्रज , डच , पोर्तुगीज आले आणि त्यांनी व्यापाऱ्याच्या वखारी स्थापन केल्या. इथला सर्व कारभार हा इंग्रजांच्या ताब्यात गेला. राणी एलिझाबेथ याच्या ताब्यात संपूर्ण कारभार गेला. भारतामध्ये अनेक संस्थानीक अस्तित्वात होते . सन १९५२ पर्यंत दोन संस्थाने अस्तित्वात होते, एक म्हणजे काश्मीरचा हिंदू राजा हरिसींग आणि हैदराबादचा निजाम, तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार ही दोन संस्थाने खालसा केली. मराठवाडा महाराष्ट्र मध्ये विलीन झाला.
शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हटले जाते. सर्वांना हक्क आणि अधिकार देण्याचे प्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्यामुळे त्यांना रयतेचा राजा म्हटले जाते.
आज प्रति क्रांती जोमात आहे, क्रांती करणारी माणसे आता कोमात गेल्यासारखी आहेत.
स्वातंत्र्याची संकल्पना महान कार्य तथागत भगवान बुद्धांनी मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वातंत्र्याची संकल्पना मांडलेली आहे. त्यांनी अनेक किल्ले जिंकून स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज हे बुद्ध विचाराकडे वळले होते असे त्यांच्या कृतीतून आपणाला दिसून येते, असे नेहमी मनाला वाटत राहते १६७४ ला गागाभट्ट यांना बोलावून राज्याभिषेक केलेला आहे आणि अष्टप्रधान मंडळ स्थापन झालं आणि या ठिकाणीच ब्राह्मणी व्यवस्थेचं षड्यंत्र चालू झालं आणि ब्राह्मण वाद सुरू झाला.
शिवाजी महाराजांचे चरित्र वाचले असता त्यांनी कोठेही वेगवेगळ्या प्रकारच्या समाजा मध्ये भेदभाव केलेला आढळून येत नाही. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा तूटपुंजे सैन्याना घेऊन लढाया त्यांनी जिंकलेल्या आहेत.
प्रतिवाध्यां चे धाडस वाढण्याचे कारण म्हणजे आंबेडकरवादी हे चिकित्सक आहेत परंतु गेल्या दहा वर्षात त्यांना हळूहळू संपवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जय भवानी जय शिवाजी एक घोषणा प्रथम केलेली आहे हे लक्षात घ्यावे.
भगवान बुद्ध सुद्धा क्षत्रिय होते . संभाजी महाराजांची जडणघडण कशी झाली त्यांना नैतिकदृष्ट्या बदनाम करण्याचा घाट अनाजीपंतांनी मांडला होता संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने खून झाला ती पद्धत अत्यंत वाईट होती आणि त्यांचे तुकडे तुकडे करण्यात आले.हा मनुस्मृतीच्या भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १६३० ते यांचा मृत्यू १६८० पर्यंत ५० वर्षाच्या कारकिर्दीचा संपूर्ण इतिहास विशद केला
प्राध्यापक सोना सुरेश आठवले हिने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या एमएससी स्टॅटिस्टिक या विषयात १० वा क्रमांक तर मागासवर्गीयांच्या मध्ये प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल तिचे अभिनंदन विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप प्रमुख पाहुणे डॉक्टर उप प्राचार्य संपतराव गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाच वर्षाची तृप्ती तूपलोंढे विस्तृत असा पोवाडा गायन केला त्यामुळे तिची आई आणि तिचा प्रमुख पाहुणे संपत गायकवाड आणि अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप यांनी सर्व उपस्थित आभार मानून धम्म पालन गाथा होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमास विहाराचे संचालक चंद्रकांत चौधरी संचालिका दीपमाला कांबळे सदस्य सुजाता चंदनशिवे भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष जितेंद्र कोलप,समत्ता सैनिक दलाचे रतन तोडकर
बोधिसत्व धम्म रत्न बोरखडे मामा शंकरराव हर्षद सर्व महिला वर्ग इंजिनिअर पी.एम.कांबळेसाहेब, अशोक वाघमारे शहाजी साबळे इत्यादी सर्व उपस्थित होते. उपस्थितताना अल्पोपहार म्हणूननाश्त्याचे पाकीट देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.