नृत्यांगना गौतमी पाटील चा कार्यक्रम पाहण्यास आलेला प्रेक्षक ग्रा.प. छतावरून कोसळला !

दत्ता ठुबे
पारनेर:- पारनेर तालुक्यातील जवळे येथील काही युवकांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला प्रसिध्द नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नाचगाण्याच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जवळे ग्रामपंचायतीच्या दुकान गाळ्यांच्या पत्र्याला मोठे भगदाड पडले आहे व त्यामुळे दुकानातील खुर्च्या व इतर काही साहीत्याचे नुकसान झाल्याचे समजते .
गौतमीचा नृत्य कार्यक्रम जवळे येथील बाजारतळावर आयोजित करण्यात आला होता . सध्या गौतमी पाटील हि नृत्यांगना तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली असल्यामुळे जवळे पंचक्रोशितुन मोठ्या संख्येने तरुण व चाहते या कार्यक्रमाला आर्वजुन उपस्थित होते .
यावेळी जवळा बाजारतळ पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे काही रसिक प्रेक्षक जागा उपलब्ध नसल्यामुळे आसपासच्या ईमारती , मंदिरे व वेशीवर बसुन कार्यक्रमाचा मनसोक्त आनंदत लुटत होते . कार्यक्रम ऐन जोमात आल्यावर काही
अतिउत्साही युवक वेशी शेजारील ग्रामपंचायत जवळे यांनी बांधलेल्या दुकान गाळ्यावर चढले व तिथे उभे राहुन कार्यक्रमाला प्रतिसाद देताना नाचु लागले . परंतु त्यामुळे गाळ्याच्या पत्र्याला मोठे भगदाड पडून एक युवक गाळ्यात खाली कोसळला . नंतर त्याला बाहेर काढण्यात आले . त्यात तो जखमी झाला असुन दुकानातील काही साहीत्याची मोडतोड झाली आहे .
दुकानाच्या झालेल्या नुकसानी बाबत दुकानदाराच्या तक्रारीवर ग्रामपंचायत व कार्यक्रमाचे आयोजन यांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत . त्याच्या भरपाईची कुणीही दखल घेईना .
नुकसान झालेल्या दुकानदाराची भरपाईची मागणी आहे . ती ग्रामपंचायत किंवा आयोजकांनी देण्यासाठी अर्जही करण्यात आला आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे . त्यामुळे दुकानदाराला मात्र विनाकारण गौतमीच्या अदांचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे .
