मराठ्यांच्या विराट सभेसाठी मोठया संख्येने उपस्थित रहा – बाळासाहेब काळे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
अंतरवाली सराटी येथे दि. १४ रोजी होत असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठ्यांच्या विराट महासभेला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन तथा शेतकरी बचाव जन आंदोलनाचे समन्वयक बाळासाहेब काळे पाटील यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे होत असलेले प्रचंड हाल डोळ्यासमोर ठेवून व शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसमोर उभे असणारे आव्हाने पेलण्यासाठी मराठा समाजाला आरक्षणा शिवाय पर्याय नाही. त्यासाठी शेतकर्यांसह शेतकरी कुटुंबातील तरुणांनी बहुसंख्याने या मराठा महासभेला उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासाठी उपस्थित राहावे व सभेनंतरही स्वतः स्वयंसेवक म्हणून सभेच्या ठिकाणी स्वच्छता करण्यास सहभागी व्हावे व या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभाग नोंदवावा
असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या। पत्रकात शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष एकनाथ काळे भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, ज्येष्ठ बाबूलालभाई पटेल,ज्येष्ठ पत्रकार आर आर माने, भाऊसाहेब सामृत, शहाराम आगळे, जालिंदर आहेर, यांच्यासह आदि पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.