राष्ट्रवादीचे जितेश सरडे यांचा पारनेर महावितरण कार्यालयात ठिय्या

राष्ट्रवादीचे जितेश सरडे यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या !
येत्या तीन दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास 28 मार्च पासुन महावितरणा विरोधात उपोषणाचा ईशारा !
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
शेतीमालाला हमीभाव नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी व सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असून , आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे जगणे ही अवघड झाले आहे .परंतु महावितरणच्या मनमानी व सुलतानी पद्धतीची वीज आकारणी तसेच ग्राहकांना वाढीव विज बिल व कट करण्यात आलेले मीटर कनेक्शन संदर्भात ,राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व प्रसारण खात्याचे राज्याचे अध्यक्ष जितेश सरडे यांनी यापूर्वीही अनेक वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर याविषयी चर्चा केली होती.महावितरणचे मुख्य अभियंता ठाकुर साहेब ,पारनेर तालुका उप अभियंता प्रशांत अाडभाई व सहाय्यक अभियंता गौरव चरडे यांच्या उपस्थितीत झालेल्या ठिय्या आंदोलनात सदर अधिकाऱ्यांनी या विषयांमध्ये आम्हाला मार्ग काढता येणार नाही असे सांगत उडवा उडवीचे उत्तर देत वेळ टाळून नेली. त्यामुळे जितेश सरडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे पारनेर तालुका कमिटीचे अध्यक्ष चंद्रभान ठूबे ,नगरसेवक योगेश मते , बाळासाहेब कावरे , सुभाष शिंदे , भूषण शेलार , श्रीकांत चौरे यांच्यासह महेंद्र गायकवाड , बाजीराव कारखिले , भाऊसाहेब आढाव , अमित जाधव , विजय तराळ,अमोल ठुबे ,गणेश मोरे सह तालुक्यातील अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पारनेर येथे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले .
आमदार निलेश लंके यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रत्येक दिवशी सर्वाधिक तक्रारी या वीज बिल व वीज आकारणी संदर्भातच येत आहेत .आमदार निलेश लंके यांनीही वारंवार याबाबत विचारणा केली आहे तरीही जवळपास आठ महिन्यापासून पारनेर तालुक्यातील अनेक घरगुती ग्राहकांना लाखाच्या आसपास नवे तर दीड लाख दोन लाख अशी घरगुती बिले आली आहेत. त्या संदर्भात सरडे यांनी निघोज या ठिकाणी महावितरणच्या विरोधात रास्ता रोखो आंदोलनही केले होते . पण त्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेले अनेक वेळी तोंडी व लेखी स्वरूपात दिलेली शब्द व लेखीप्रत यांना मात्र सध्याच्या परिस्थितीत केराची टोपली दाखवली आहे. मार्च एंडिंगच्या नावाखाली अनेक घरगुती मीटरचे कनेक्शन कट करून ग्राहकांना अंधारात ठेवण्याचे काम केले आहे .मागील सहा महिन्यापासून वेळोवेळी सूचित करूनही नेमलेल्या एजन्सीच्या चुकीमुळे हा फार मोठा गोंधळ शेकडो घरांच्या बाबतीत झाला आहे . त्या एजन्सी सोबत ग्राहकांची बैठक आयोजित करा अशी मागणी करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वारंवार टाळाटाळ केली आहे.
ग्राहक नियमित विज बिले भरत असतानाही एजन्सीच्या चुकीमुळे त्यांना भुर्दंड सहन करावा लागत असेल तर त्यात स्पष्टपणे महावितरणचीच चुकी आहे.मीटर रिडींग घेण्यास कोणीही येत नाही .याची जाणीव वेळोवेळी अधिकाऱ्यांना करूनही त्याकडे मात्र त्यांनी कानाडोळा केला होता. दोन वर्ष मीटर रिडींग घेण्यास नेमलेल्या एजन्सी येत नव्हत्या त्यावेळेस आपण कुठे होता ? आपल्या चुकीमुळे सुलतानी पद्धतीने ग्राहकांना दिलेली वीजबिले आले आहेत त्यात ग्राहकांची काय चूक आहे ? तुम्ही आज वाढीव व आवास्तव आलेल्या बिलांना हप्ते पाडून देत आहात ग्राहकांनी काय तुमच्याकडून कर्ज घेतले आहे का तेव्हा त्यांनी हप्ते भरून तुमच्या कर्जाची परतफेड करायची ? असा खडा सवाल सरडे यांनी महावितरणच्या अभियंता व त्यांच्या वरिष्ठांस केला . आणि आता बिले वसूल करताना मार्चच्या नावाखाली महावितरणचे कर्मचारी व अधिकारी घरोघरी फिरताय ही तत्परता त्या काळात का दाखवली गेली नाही ? पारनेर तालुक्यात किमान चाळीस हजार मीटर बसवले असून त्यापैकी अकरा हजाराहून अधिक मीटर नादुरुस्त आसताना त्याकडे महावितरणचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे . त्याचा विचार न करता ही चुकीच्या पद्धतीने सामान्य ग्राहकांकडून विज बिल आकारणी का करता ? असाही सवाल सरडे यांनी अधिकाऱ्यांना केला.
शुक्रवारी महावितरणच्या कार्यालयात केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे अधिकारी वर्गानी कुठलीही सकारात्मक उत्तरे न दिल्या कारणामुळे सरडे यांनी
येत्या सोमवार पर्यंत म्हणजे 27 मार्च पर्यंत जर ग्राहकांचे कट केलेले सर्व कनेक्शन जोडून दिले नाही व एजन्सीच्या चुकीमुळे सदर एजन्सी कडून ग्राहकांचे वीज बिल वसूल करावे असेही महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . कोणताही ग्राहक दिलेल्या हजारोंच्या रकमेत असलेले महावितरणच्या एजन्सीच्या चुकीमुळे आलेले अवास्तव बिल भरणार नाही .याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणाची राहील व सदर मागण्या जर मान्य झाल्या नाही तर 28 मार्च रोजी सकाळी 10 वाजता महावितरणच्या कार्यालयात अनेक ग्राहकांना घेऊन न्याय मिळेपर्यंत आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली अमरण उपोषणास बसनार आहे. असा इशारा जितेश सरडे यांनी दिला असून पारनेर तालुक्यातील महावितरणने नेमलेल्या एजन्सीच्या चुकीमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर जे आर्थिक संकट उभे राहिले आहे त्या सर्वांनी सदर उपोषणास आपल्या न्याय हक्कासाठी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कमिटीचे अध्यक्ष चंद्रभान ठुबे यांनी केले आहे .