इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि. १८/०२/२०२२

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २९ शके १९४३
दिनांक :- १८/०२/२०२२,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३०,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- व्दितीया समाप्ति २२:३०,
नक्षत्र :- पूर्वा समाप्ति १६:४२,
योग :- सुकर्मा समाप्ति १८:३०,
करण :- तैतिल समाप्ति १०:३८,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – धनिष्ठा,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

राहूकाळ:- सकाळी ११:१७ ते १२:४३ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०८:२३ ते ०९:५० पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:५० ते ११:१७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:४३ ते ०२:१०
पर्यंत,

दिन विशेष:-
मीनायन २२:१२, सौर वसंतऋतु प्रारंभ,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २९ शके १९४३
दिनांक = १८/०२/२०२२
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकार्‍यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इतरांवर छाप पडण्यात यशस्वी व्हाल.…

वृषभ
जुगाराची हौस पूर्ण कराल. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता. मुलांच्या खेळकरपणात रमून जाल. नाटक वा सिनेमा पाहण्याचे ठरवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

मिथुन
घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवसभर कामातच व्यग्र राहाल. सारखे मत बदलू नका. कामात एकसूत्रता ठेवावी. आततायीपणा करून चालणार नाही.

कर्क
जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. भावंडांच्या सानिध्यात रमून जाल. नवीन लोकांशी संपर्क होईल. जोडीदाराचा शांत स्वभाव मनात भरेल. एककल्ली विचार करू नका.

सिंह
मानसिक चंचलता जाणवेल. गोडाधोडाचे पदार्थ चाखाल. भागीदारीत नवीन विचार मांडाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.

कन्या
दिवस घाईघाईत जाईल. घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. वैचारिक शांतता जपावी. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.  उत्तम गृहसौख्य लाभेल.

तूळ
आशावादी दृष्टीकोन ठेवावा. घरात तुमचे प्रभुत्व राहील. सर्वबाबी अभ्यासूपणे जाणून घ्याल. वैवाहिक सौख्याच्या बाबीत समाधानी राहाल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

वृश्चिक
संभाषणाची आवड पूर्ण कराल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावेत. कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्या. नोकरांचे सुख मिळेल.  

धनू
योग्य तर्काचा वापर कराल. आपले बौद्धिक ज्ञान उत्तमरीत्या वापराल. लहान प्रवास करावा लागेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. काही गोष्टींचे एकवार चिंतन करावे.

मकर
सामुदायिक वादात लक्ष घालू नका. जुनाट विचार करणे सोडून द्यावे. आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडाल. न डगमगता आपले विचार मांडाल. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल.

कुंभ
आपले प्रभुत्व दाखवाल. अचानक धनलाभ संभवतो. वैचारिक स्थिरता ठेवावी. नवीन मित्र जोडावेत. तुमच्या हातातील कलेचे कौतुक केले जाईल.

मीन
कागदपत्रांची नीट छाननी करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल. कामातील क्षुल्लक अडथळे दूर करावेत.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button