शेवगाव च्या काकडे विद्यालयाची विद्यार्थीनी गीतांजली लोंढे हीची महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघात निवड

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2023 दरम्यान राज्यस्तरीय शालेय स्पर्धेचे आयोजन नागपूर या ठिकाणी करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये निवड चाचणीतून आबासाहेब काकडे विद्यालयाची खेळाडू गीतांजली लोंढे हिची राजस्थान बिकानेर या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
बिकानेर येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी ती महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे.तिला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक भागवत कल्पेश, घुटे विक्रम, संतोष ढोले. यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड. डॉ. विद्याधरजी काकडे साहेब, जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंग भैय्या काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण बिटाळ , शालेय व्यवस्थापन समिती प्रमुख वंदना पुजारी विद्यालयाचे प्राचार्य संपत दसपुते ,उपप्राचार्या रुपा खेडकर,उपमुख्याध्यापिका मंदाकिनी भालसिंग ,पर्यवेक्षक शिवाजी पोटभरे,पुष्पलता गरुड ,सुनिल आव्हाड तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनींनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.