दिल्ली येथे श्रीमती सिंधुताई साठे सावित्री कन्या पुरस्काराने सन्मानित

अकोले प्रतिनिधी
लोकशाहीर जनकल्याण सेवा समितीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्वान महिलांना दिला जाणारा सावित्री कन्या पुरस्कार यावर्षी श्रीमती सिंधुताई नारायण साठे यांना प्रदान करण्यात आला नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. श्रीमती साठे या महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलविंदर सिंग होते केंद्रीय मंत्री डॉ भागवतराव कराड यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आला याप्रसंगी प्राध्यापक नाम साठे सर समितीचे अध्यक्ष प्रतिमा ताई सोळशे बहुजन रयत परिषद महिला अध्यक्ष कोमलताई साळुंखे केंद्रीयमत्री हुसेन दलवाई इत्यादी मान्यवर देशभरातून उपस्थित होते