पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या चेअरमन पदी काशिनाथ दाते यांची पाचव्यांदा बिनविरोध निवड

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:-
पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या चेअरमनपदी काशिनाथ दाते यांची पाचव्यांदा सलग बिनविरोध निवड झाली असून व्हाईस चेअरमनपदी सुरेश बो-हुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे
पारनेर तालुक्यातील अग्रगण्य असणारी पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २०२३ ते २०२८ पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली असून आज दुपारी चार वाजता संचालक मंडळाची पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत सभा पार पडली.
सहाय्यक निबंधक गणेश औटी यांच्या अध्यक्षतेखाली पारनेर येथील पतसंस्थेच्या सभागृहामध्ये संचालक मंडळाची सभा संपन्न झाली. या सभेमध्ये चेअरमनपदी काशिनाथ दाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमनपदी सुरेश बोऱ्हुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

चेअरमन पदासाठी सूचक सुरेश बोऱ्हुडे होते तर अनुमोदक लक्ष्मण डेरे होते तर व्हॉइस चेअरमन पदासाठी सूचक सिताराम कापसे होते तर अनुमोदक मयूर गांधी होते
यावेळी संचालक रखमाजी कापसे, बाळासाहेब सोबले , लक्ष्मण ढेरे, मयूर गांधी, अर्जुन गाजरे, राजेंद्र औटी, पांडुरंग भांदिगरे, सुभाष राठोड कृष्णा उमाप , सुनंदा दाते , आशा तराळ संस्थेचे कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात, उद्योजक दिलीप दाते, सुनील गाडगे उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक गणेश औटी होते तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सुभाष थोरात यांनी काम पाहिले
पारनेर ग्रामीण संस्थेच्या २०५ कोटी ५० लाख रुपये ठेवी असून कर्ज वितरण १६० कोटी ७० लाख रुपये असून खेळते भांडवल २३८ कोटी १ लाख रुपये आहे. संस्थेच्या पारनेर शहर, टाकळी ढोकेश्वर , जामगाव , कामोठे, खडकवाडी , आळेफाटा , शिरूर , सूपा येथे संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहे.