पारनेरचे अशोक पानसरे झाले शिवसेने चे ठाणे जिल्हा विभाग प्रमुख!

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
पारनेरचे सुपुत्र अशोक मारुती पानसरे यांची ठाणे जिल्ह्यात नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत विभाग प्रमुख पदी नेमणूक जाहीर केली.
अशोक पानसरे यांचे मुळ गाव पारनेर असुन सेनापती बापट विद्यालय पारनेर येथे त्यांनी इ.११वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर अहमदनगर येथे न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मध्ये सन. १९७७ ला B.A. झाल्यानंतर मुंबई येथे नोकरी निमित्त सन. १९७९ साली गेले. त्यांनी स्वतः चा व्यवसाय सुरु करुन आपले तीन भावंडे मुंबई ला नेली. वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे, व स्व. आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने व खासदार राजन विचारे साहेब यांच्या बरोबर शिवसेना ठाणे जिल्हा येथे शिवसैनिक म्हणुन काम केले, त्यांनी गटप्रमुख, उप शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख असी ४० वर्ष शिवसेनेत अविरत कार्यरत आहेत. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजी पानसरे यांचे ते बंधू आहेत.
दि.६ नोव्हेंबर २०२२ रोजी आदरणीय पक्ष प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विभाग प्रमुख या पदावर त्यांची नियुक्ती केली, पक्षाने दिलेली जबाबदारी कृतज्ञ पणे व प्रामाणिक पणाने स्विकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या झालेल्या निवडीबद्दल विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी, जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसलेपारनेर शिवसेना तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख प्रियंका ताई खिलारी, आणि युवा सेना तालुकाप्रमुख नितीन शेळके यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या .