इतर

जळीत तथा भाजलेल्या रुग्णांनाही शहरी गरीब योजनेचा लाभ मिळावा; रुग्ण हक्क परिषदेची मागणी

दत्ता ठुबे

पुणे दि. 31- पुण्यात दररोज भाजून, होरपळून जखमी होणाऱ्या रुग्णांची संख्या दोन ते पाच इतकी आहे. गॅस शेगडीचा भडका उडाल्याने, अंगावर उकळते गरम पाणी सांडल्याने, वाहनांचा किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा स्फोट होऊन आगीत होरपळून जखमी होणाऱ्या रुग्णांवर उपचारांचा खर्च हा दहा लाखाच्या पुढे नेहमीच जात असतो. सर्वच रुग्णांची आर्थिक परिस्थिती सध्याच्या परिस्थितीमध्ये तितकी नाही. अशा उपचारांसाठी येणारा सात ते दहा लाख रुपयांचा खर्च सर्वांनाच परवडणारा नाही. अशावेळी पुणे महानगरपालिकेची शहरी गरीब योजना दिलासा दायक ठरू शकते, जळीत आणि भाजलेल्या रुग्णांना शहरी गरीब योजनेचा लाभ झाला पाहिजे, अशी मागणी रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने आज करण्यात आली.
या संदर्भातील मागणीचे निवेदन पुणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आरोग्य प्रमुख श्री भगवान पवार यांना देण्यात आले. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, केंद्रीय कार्यालयीन सचिव संजय जोशी, पुणे शहर अध्यक्ष सौ अपर्णा साठे -मारणे, पुणे शहर उपाध्यक्ष यशवंत भोसले, रुग्ण हक्क परिषदेचे जेष्ठ सदस्य तुळशीदास तांबे तसेच पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख संजीव वावरे देखील यावेळी उपस्थित होते.
रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले की, भारतातील सर्वच शहरातील महानगरपालिकांमध्ये रुग्णसेवा विषयी उदासीनता दिसून येते मात्र रुग्णांना शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी एक ते दोन लाख रुपयांची मदत करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील रुग्ण सेवा करणारी क्रमांक एक ची महानगरपालिका आहे. रुग्णांना मदत करण्यासंदर्भातली अशी योजना भारतातील कुठल्याही महानगरपालिकेची नाही मात्र तरीही भाजलेल्या जळालेल्या रुग्णांना मदत मिळत नाही, ही असंवेदनशील बाब पुणे महानगरपालिकेच्या निदर्शनात आणून दिली. आरोग्य प्रमुखांनी यावर तात्काळ होकार देऊन जळीत आणि भाजलेल्या रुग्णांना मदत करण्याचे वचन दिले आहे. ही बाब आम्ही समाधानकारक असल्याचे मानतो
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button