अमित भांगरे अकोल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार!

अकोले प्रतिनिधी
अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी युवा नेते अमित अशोकराव भांगरे यांना आज जाहीर करण्यात आली
अमित भांगरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती मात्र शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे सुपुत्र माजी आमदार वैभवराव पिचड ,तसेच मधुकरराव तळपाडे ,मारुती मेंगाळ, हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते त्यांनी पक्षाशी संपर्क करून महाविकास आधाडी कडून उमेदवारीची मागणी केली होती मात्र आज अधिकृतरित्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जिल्हा बँकेचे संचालक अमित अशोकराव भांगरे यांची उमेदवारी जाहीर केल्याने यावर आता पडदा पडला आहे
अनेक दिवसापासून या उमेदवाराची प्रतीक्षा ताणली होती शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीत भांगरे यांचे नाव न आल्याने अकोले मतदारसंघाच्या उमेदवारी बाबत उत्सुकता ताणली होती महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाकडे जाते या वर अनेक चर्चा सुरू होत्या अखेर आज दुसऱ्या यादीत अमित भांगरे यांचे महाविकास आघाडीच्या वतीने नाव जाहीर करण्यात आले आहे
यामुळे अकोल्यात महाविकास आघाडी आणि महायुती असा सरळ सामना होऊ शकतो त्यात माजी आमदार वैभव पिचड यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे पवार काका पुतण्यांच्या प्रतिष्ठेची असणारी अकोल्यातील ही किरण लहामटे व अमित भांगरे यांच्या तील लढाई कशी होणार याकडे आता लक्ष लागले आहे वैभवराव पिचड यांना भाजप ची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरला आहे अंतिम तारखेला पर्यंत ते काय भूमिका घेतात यानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे
किरण लहामटे यांनी अजितदादा गटामार्फत महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनी आपला अर्ज दाखल केला आहे मात्र अर्ज दाखल करतानाच महायुती च्या घटक पक्षातील कार्यकत्यांना त्यांनी विश्वासात घेतले नसल्याचा आरोप त्यांच्यावर लगेच होऊ लागला आहे
अमित भांगरे यांच्या उमेदवारी ची घोषणा शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केली त्यानंतर अकोला तालुक्यात या निवडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले भांगरे यांचा उमेदवारी अर्ज भव्य शक्ती प्रदर्शन करत मंगळवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता भरणार आहे
नामनिर्देशन अर्ज सादर करताना महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालय अकोले अशी भव्य रॅली काढण्यात येणार आहे त्यांनतर
खासदर .सुप्रियाताई सुळे माजी मंत्री काँग्रेसचे नेते आ.बाळासाहेब थोरात शिर्डी चे शिवसेना खासदार.भाऊसाहेब वाकचौरे शेतकरी नेते माकप चे राज्य सरचिटणीस कॉ.अजित नवले कॉ.कारभारी उगले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत अकोले बाजार तळावर भव्य सभा होणार आहे या वेळी हाजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास वतीने केले आहे अमित भांगरे ,वैभव पिचड, किरण लहामटे या प्रमुख उमेदवारा व्यतिरिक्त काही अपक्ष अर्ज दाखल झाले असले तरी खरी लढतीचे चित्र अर्ज माघारीच्या अंतिम तारखेनंतर स्पष्ट होणार आहे प्रमुख उमेदवारांच्या उमेदवारी निश्चित झाल्याने अकोले तालुक्यात आता राजकीय धुळवडीचा रंग चढू लागला आहे