इतर

पाना- फुलांच्या रांगोळी तुन साधला कलात्मकतेचा संगम’..

.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील सुमारे २८० स्पर्धकांचा सहभाग !

सोलापूर – गुढीपाडव्यानिमित्त महिलांसाठी जिल्हास्तरीय पाना – फुलांच्या रांगोळी स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग होऊन कलात्मकतेनी भरलेल्या रांगोळी काढल्या. या स्पर्धेत शहर आणि जिल्ह्यातील मिळून जवळपास २८० महिलांनी सहभाग घेतला

एकापेक्षा एक विविध पाना – फुलांच्या सहाय्याने रांगोळी काढल्या. बघणा-यांनी डोळ्यांच्या पापण्या न हलवता असेच बघाव्यात अशापध्दतीने रांगोळी काढल्या होत्या. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत, पौरोहित्य प्रशिक्षका डॉ. अपर्णा कल्याणी, माजी महापौर जनार्दन कारमपूरी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त रामचंद जन्नू, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे सचिव गणेश पेनगोंडा, पद्मशाली सखी संघमच्या सहखजिनदार ममता तलकोकूल, फाउंडेशनचे सल्लागार सुकुमार सिध्दम, उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी कार्यकारिणी विश्वस्त सदस्य श्रीनिवास रच्चा, श्री मार्कंडेय जनजागृतीचे कार्याध्यक्ष किशोर व्यंकटगिरी, शिक्षक हरिप्रसाद बंडी सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचा निकाल याप्रमाणे :

प्रथम क्रमांक (नेकलेस) – रुचिता आडम, द्वितीय (झुमका) – श्रवंती संभारम तर, तृतीय (बांगड्या) – अक्षता शिंदे यांनी पटकावले. हे बक्षीसे पुरुषोत्तम पोबत्ती यांच्या तर्फे उत्तेजनार्थ : प्रथम क्रमांक (बालाजी पादुका) – सुप्रिया ताकभाते (रा. माढा-संमतीनगर ), द्वितीय (बालाजी पादुका) – अश्विनी गायकवाड (रा. पंढरपूर- करकंब) तर, तृतीय क्रमांक (बालाजी पादुका) – वैष्णवी बडवे (रा. विठ्ठल मंदिर, पंढरपूर) हे पारितोषिके अंबादास बिंगी यांच्याकडून आणि सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकांना प्रमाणपत्र सोमनाथ केंगनाळकर यांच्या वतीने देण्यात आले.

हा उपक्रम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. याप्रसंगी रजपूत, डॉ. कल्याणी, कारमपूरी, जन्नू आणि पेनगोंडा यांनी विजेत्या स्पर्धकांना अभिनंदनपर मार्गदर्शन करुन मत व्यक्त केले. या स्पर्धेचे परिक्षण स्मिता बंडी यांनी केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप क्षीरसागर यांनी केले. श्रीनिवास रच्चा यांनी प्रास्ताविक तर, ममता तलकोकूल यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button