जामखेड शहरात महामानवां च्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन

गायक आनंद शिंदे यांचा यांच्या गाण्याची मैफिल रंगणार
दत्ता ठुबे
अहमदनगर:
अखंड महाराष्ट्राला व देशाला दिशा देणारे ऊर्जा स्त्रोत असणाऱ्या महामानवांच्या जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या मंगलमय वातावरणात साजऱ्या होत असते .महाराष्ट्राच्या थोर क्रांतिकारी सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वांचे शौर्य गीतांचा नजराणा हा महाराष्ट्राच्या जनतेला ऊर्जा देणारी प्रेरणादायी पर्वणी असते .
साउ फाउंडेशन आयोजित जामखेड शहरात प्रथमच महामानवाच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाण्यांचा भव्यदिव्य कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.तसेच जामखेड तालुक्यातील रहिवासी असणारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या युवाचा सन्मानही या ठिकाणी करण्यात येणार आहे.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरील गीतांचा शिंदेशाही बाण्यातून कलाविष्कार गायक आनंद शिंदे व सहकारी या महापुरुषांचे गीते सादर करणार आहेत .
बाजारतळ जामखेड या ठिकाणी दि.11 एप्रिल 2023 सायं.6 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे .
या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व नागरिक,महिला,युवक पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी मोठया संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन आयोजक साउ फाउंडेशनचे संस्थापक /अध्यक्ष व नायगाव ग्रा.पं.सदस्य संध्या सोनवणे यांनी केले आहे.