महावितरणच्या कामांसाठी दिड कोटींचा निधी मंजूर

आ. नीलेश लंके यांची माहिती
दत्ता ठुबे/पारनेर : प्रतिनिधी
महावितरणच्या पारनेर-नगर मतदारसंघातील विविध गावांतील कामांसाठी १ कोटी ४८ लाख ७८ हजार रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून त्यातून विविध गावांचे ट्रान्सफॉर्मर, रोहित्र तसेच सिंगल फेज विद्युतीकरण करण्यात येणार असल्याचे आ. नीलेश लंके यांनी सांगितले.
महावितरणच्या विविध कामांसाठी निधी मिळावा यासाठी आ. नीलेश लंके यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून दिड कोटींचा निधी मंजुर होऊन विविध गावांतील कामे मार्गी लागणार आहेत.
▪️विविध गावांतील महावितरणची कामे व त्यास मंजुर निधी पुढीलप्रमाणे
काकणेवाडी येथे ६३ के.व्ही. ट्रान्सफॉर्मर बसविणे १२ लाख ८९ हजार, वडनेर बुद्रुक येथील टेंंभी मळा-बोऱ्हाडे मळा येथे ६३ केव्ही ट्रान्फॉर्मर बसविणे १० लाख ८५ हजार, नगर तालुक्यातील कामरगांव येथील विठ्ठलवाडी येथे सिंगल फेज विद्युतीकरण करणे ५ लाख १८ हजार, कडूस येथील करंजुले वस्ती येथे डीपी बसविणे ५ लाख १८ हजार, नारायणगव्हाण येथील जाधवदरा येथे उच्चदाब रोहित्र बसविणे ५ लाख ५४ हजार, निघोज येथील काळेवाडी कॅनॉलजवळ सिंगल फेज विद्युतीकरण करणे १५ लाख ३५ हजार, मोरवाडी, निघोज येथे सिंगल फेज विद्युतीकरण करणे १० लाख ९५ हजार, निघोज येथील रसाळवाडी येथील मळगंगा मंदिर परीसरात सिंगल फेज विद्युतीकरण करणे १३ लाख ९५ हजार, निघोज येथील शिवडी वस्ती येथे सिंगल फेज विद्युतीकरण करणे ८ लाख २४ हजार, निघोज येथील सावकार-लामखडे वस्ती-मुका मळा पुनर्वसन येथे सिंगल फेज विद्युतीकरण करणे ८ लाख १ हजार, वाडेगव्हाण येथील ताऱ्हे वस्ती येथे उच्चदाब रोहित्र बसविणे ७ लाख ७५ हजार.