इतर

रयत मध्ये शिक्षण घेता आले नाही पोलीस निरक्षक मोहन बोरसे यांची खंत 

अकोले प्रतिनिधी 

 जन्म गावी रयत शिक्षण संस्थेची शाखा असून देखील वडिलांच्या नोकरीमुळे मला रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेता आले नाही अशी खंत आजही माझ्या मनात आहे असे  प्रतिपादन अकोले  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी काढले. 

कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पिंपळदरी, तालुका अकोले, येथील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते 

ते पुढेम्हणाले  कि त पिंपळदरी सारख्या छोट्याशा गावात आश्रम शाळेची सुसज्ज अशी भव्य इमारत शिक्षणाचा ज्ञानकुंभ भरवत आहे ,हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पर्वणीच आहे .त्याचा लाभ गावातील व परिसरातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी कलागुण आत्मसात करावेच पण त्याचबरोबर आत्मरक्षा ,सामाजिक सुरक्षा याचे ज्ञान घ्यावे असे म्हणाले 

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता बाबासाहेब मांडे होत्या . शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,माजी सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ,संचालक ,विविध सेवाभावी संस्थेचे सदस्य ,माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक धनंजय मलाव, राधेश्याम जगधने ,भाऊसाहेब राऊत, शंकर कडाळे ,मंदा घुले ,संगीता आंबरे, शीतल गिरी ,दीपक कदम , अशोक कोरके ,योगेश येवला, विठ्ठल चौधरी ,प्रवीण जगताप ,छाया ठोकळ, मंगेश निकम ,प्रमोद कोल्हे यांनी सहकार्य केले .

   सूत्रसंचालन विजय सहाणे तसेच आभार प्रदर्शन सुनील शेळके यांनी केले.

————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button