आश्वी बुद्रुक पोलीस स्टेशन च्या हाकेच्या अंतरावर घरफोड्या!

संगमनेर प्रतिनधी’:- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर शनी वारी मध्यरात्री चोरट्यानी तीन ते चार ठिकाणी घरफोड्या करत मोठा ऐवज चोरून नेल्याची जोरदार चर्चा सुरु असून याबाबत मात्र एकच गुन्हा दाखल झाल्यामुळे इतरांनी गुन्हा दाखल करण्याचे का टाळले.? हे मात्र कळू शकले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री आश्वी पोलीस स्टेशन पासून पाचशे फुटाच्या अंतरावर भरवस्तीत चोरट्यांनी तीन ते चार ठिकाणी चोऱ्या करुन मोठा ऐवज चोरून नेल्याची चर्चा आहे. मात्र आश्वी पोलीस ठाण्यात लहानबाई सटवा खेमनर यांनी एकमेव चोरीची तक्रांर दाखल केली आहे.
यामध्ये लहानबाई खेमनर शनिवारी नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी वीस हजार रुपये रोख व सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे ३५ ते ४० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा रंजिस्टर नबंर १३२/२०२२ नुसार भादंवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डी. डी. बर्डे हे चोरीचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान खेमनर यांच्या घराशेजारी असलेल्या तीन ते चार ठिकाणी चोरट्यांनी हाथ साफ केल्याची गावात चर्चा आहे. मात्र या ठिकाणी झालेल्या चोऱ्याची पोलीस ठाण्यात नोंद झालेली नसल्यामुळे नागरीकानमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. तर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अतंरावर चोऱ्या झाल्यामुळे नागरीकानमध्ये भितीचे वातावरण असून चोराना जेरबंद करण्याची मागणी नागरीकानी केली आहे.