कंत्राटी धोरणाची उद्या शेवगाव तहसील समोर होळी व थाळी नाद आंदोलन”

सरकार पेन्शनचा हक्क हिरावून घेवू शकत नाही
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने आयुष्यभर केलेल्या सेवेमुळे कर्मचारी पेनशनला पात्र असून सेवाशर्थीच्या नियमानुसार सरकार कर्मचारी वर्गावर नवीन पेन्सीसाठी जबरदस्ती करू शकत नाही त्यामुळे बेमुदत सुरू असलेल्या संपात कोणत्याही कारवाईला न घेता सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अठरा लाख कर्मचारी संपावर असल्याने सरकारला आपल्या न्याय मागण्याचा विचार करावाच लागेल असे प्रतिपादन पीडीएफ चे ज्येष्ठ नेते माजी प्राचार्य अशोक नवल यांनी आज संपाच्या 6 व्या दिवशी शेवगाव तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या सत्याग्रह आंदोलनासमोर बोलताना केले यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी कृषी आरोग्य असेल पंचायत समिती विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संप सुरू होऊन सहा दिवस झाले असतानाही सरकार कर्मचारी संघटना बरोबर कोणतीही चर्चा करत नसल्याने उपस्थित आणि खेद व्यक्त केला यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हा कार्यवाहक व शेवगाव तालुका सरकारी सरकारी जुनी पेन्शन कर्मचारी समन्वय संघाच्या वतीने संजय भुसारी यांनी सांगितले की उद्या सोमवारी सातव्या दिवशी तहसील कार्यालय समोर थाळी नाद आंदोलन व कंत्राटी पद्धतीच्या कामगारांची भरती या शासनाने घेतलेल्या निर्णयाची होळी उद्या दिनांक सोमवार रोजी करण्यात येणार असून ठीक दहा वाजता सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे आज उपस्थित असलेल्या कर्मचारी बांधवांना यावेळी बँकेचे संचालक रमेश गोरे ,बाळकृष्ण कंठाली,
बाबासाहेब विखे शिक्षक भारतीचे उपाध्यक्ष,नानाभाऊ शिंदे, सविता पवार ,कल्याण राऊत यांची भाषणे झाली
यावेळी उपस्थित ,माध्यमिक शिक्षक बँकेचे संचालक सत्यवान थोरे, शिक्षक बँकेचे संचालक रमेश गोरे,प्राथमिक शिक्षक संघाचे विलास लवांडे मच्छिन्द्र भापकर,कल्याण मुटकुळे , विस्तारधिकरी सचिन भाकरे,भाऊसाहेब पाचर्णे,राम पठाडे,दिव्यांग कर्मचारी भीमाबाई भिसे मॅडम कर्मचारी ज्ञानेश्वर सोंडे, ना .ची. शिंदे,सखाराम सातपुते ,राजेंद्र दौंड,उपस्थित होते