पत्रकार श्रीकांत चौरे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित !

सहकार मंत्री ना.अतुल सावे यांचे सह विवीध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न !
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभ संभाजीनगर येथे शुक्रवारी सहकार मंत्री ना.अतुलजी सावे यांच्या हस्ते दैनिक मराठवाडा साथी वृत्तपत्राचे पारनेर तालुका प्रतिनिधी श्रीकांत चौरे यांना पश्चिम महाराष्ट्रातून “पत्रकारिता जीवनगौरव ” राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून गेले काही वर्षात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून राजकीय , सामाजिक ,कला, क्रीडा , संस्कृतीक, धार्मिक तसेच विविध क्षेत्रातील विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण लिखाण करून आपल्या पारदर्शक निर्भीड व अभ्यासू पत्रकारितेचा ठसा उमटविला आहे . याची दखल घेत पश्चिम महाराष्ट्रातून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन महाराष्ट्रातील मान्यवर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना पत्रकारिता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
गेल्या अनेक वर्षापासून दैनिक मराठवाडा साथी या ऋतपत्र परिवारातील सदस्य बनून पारनेर नगर तालुक्यातील पत्रकारीते सोबतच सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , कृषी यासह विविध क्षेत्रात भरीव योगदान दिल्यामुळे व वृत्तपत्राच्या माध्यमातून जनसामान्यांचे आणि प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून देण्याचे उल्लेखनीय कार्याची दखल घेत दैनिक मराठवाडा साथी या सह इतर अनेक दैनिकांमध्ये तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया व कोरोणा महामारीच्या काळात पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या बरोबर भाळवणी व कर्जुले हर्या या ठिकाणी सुरू केलेल्या शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर मध्ये आमदार साहेबांच्या बरोबर रुग्णसेवा करत कोवीड या जैविक विषाणूची भीती रुग्णांच्या मनातून घालविण्यासाठी फेसबुक लाईव्ह प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटविणाऱ्या व पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य करत एक निर्भीड व अभ्यासू पत्रकार म्हणून नावलौकिक मिळवलेले पत्रकार श्रीकांत चौरे यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर येथे सन्मानित करण्यात आले .
कॉलेज जीवनापासून अनेक सामाजिक संस्थेत,संघटनेत ,साहित्य कला क्रीडा मध्ये तसेच समाजकारणात तसेच राजकीय शैक्षणिक प्रवाहात हिरारीने सहभाग नोंदवत वेगळेपण सिद्ध करणारे व अनेक वंचित गरीब घटकांपर्यंत पोहचत त्यांच्या न्याय हक्कासाठी पाठपुरावा करत त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे समाज सेवक म्हणून ओळख निर्माण करणारे पत्रकार श्रीकांत चौरे यांना त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत दैनिक मराठवाडा साथी वृत्तपत्राने विशेष जीवन गौरव पुरस्कार देत सन्मानित केले .
दै.मराठवाडा साथी वृत्तपत्रात केलेल्या उल्लेखनिय पत्रकारीतेचा राज्यस्तरीय विशेष गौरव पुरस्कार प्रसंगी मुख्य संपादक व दै.मराठवाडा साथीचे सर्वेसर्वा जगदीश बियाणी, नगर अावृत्ती प्रमुख बाजीराव खांदवे सर ,निवासी संपादक केशवजी काळे , प्रमोद अडसुळ , राजेश बाठीया, ाशोक सुर्यवंशी , विजय तराळ पारनेर,संदीप तांबे मेजर गोरेगाव, एकनाथ गवारे , अमित चव्हान , संदिप वाघ , मेजर शुभम गवारे पवन कोरडे प्रमोद सुर्यवंशी , व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजी नगर येथे सहकार मंत्री , सन्मानित करण्यात आले .
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व दै.मराठवाडा साथीच्या वतीने मागील 3 वर्षांपासून देण्यात येणाऱ्या पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार – 2023 ची घोषणा निवड समितीने केली होती. या वर्षी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांसोबतच ‘पत्रकारिता जीवन गौरव’ पुरस्कार व जनसंपर्कात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना ‘कार्यगौरव’ पुरस्कार देण्यात आला. तसेच प्रत्येक विभागातून पुरस्कार देण्यात आला. आशी माहीती राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी दिली.
यंदाच्या पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड समितीने ‘पत्रकारिता जीवन गौरव’ पुरस्कारासाठी राज्यातील सर्वच विभागातून मोठ्या प्रमाणात पुरस्कारासाठी प्रवेशिका आल्या होत्या. निवड समितीने पुरस्कारांसाठी आलेल्या साहित्यांचे परीक्षण करून विजेत्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
विभागीय पुरस्कार प्राप्त मान्यवर !
पश्चिम महाराष्ट्र विभाग : श्रीकांत चौरे (दै.मराठवाडा साथी, पारनेर तालुका प्रतिनिधी) यांना राज्यस्तरीय तर जिल्हास्तरीय पुरस्कार श्री .अशोक सूर्यवंशी (दै.मराठवाडा साथी,मिरजगाव प्रतिनिधी),नरहरी शहाणे (दै.मराठवाडा साथी, पाथर्डी तालुका प्रतिनिधी),अजय नजन (दै.मराठवाडा साथी, शेवगाव तालुका प्रतिनिधी),किसन पवार (दै.मराठवाडा साथी, कोपरगाव तालुका प्रतिनिधी) यांच्या नावाची सर्व परीक्षक मंडळीने निवड केली असून लवकरच निवड समिती व सदर पुरस्काराचे आयोजक महाराष्ट्र स्तरावरील मान्यवर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कारांचे वितरण करत सदर सन्मानार्थिला पुरस्कार प्रदान करत सन्मानित करण्यात आले .
पत्रकार श्रीकांत चौरे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय ” पत्रकारिता जीवनगौरव ” पुरस्कारामुळे पारनेर नगर मतदार संघात, एक सर्व सामान्य तरुणाने आपल्या अंगी असनाऱ्या जिद्ध चिकाटी, प्रामाणिकपना व पारदर्शक अभ्यासू पत्रकारितेतून सर्व सामान्य जनतेच्या मूलभूत न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या बळावर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला व अल्पावधीतच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे.माझ्या या पत्रकार बंधुच्या अष्टपैलू कर्तुत्वाचा मला अभिमान आहे. त्यांना यापुढील काळात पत्रकारिता क्षेत्रात उत्तुंग यश मिळो व मतदार संघात त्यांच्या यशाचा आलेख असाच उंचावत जावो त्यांचे अभिनंदन करतो व भावी कार्यास शुभेच्छा देतो .
आमदर निलेश लंके