राजूरला संतसेना महाराज पुण्यतिथी साजरी!

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी सोहळा राजूर मध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त सकाळी ९ वाजल्यापासून श्रीसंत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
हरी भजन, महाआरतीनंतर भव्य दिव्य अशी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. याप्रसंगी नाभिक समाज बांधव सहभागी झाले.
यात महिला वर्गांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा आनंद लुटला. यावेळी समाजाचे अध्यक्ष विनायक पंडित, कार्याध्यक्ष विलास तुपे, गणेश बोऱ्हाडे, वैभव शेलार, अमोल पंडित, सुनील पंडित, संदीप शिंदे, आनंद बिडवे, तुषार शेलार, गणेश पंडित, मारुती शिंदे,पंडित, सारंग बोराडे, निवृत्ती शेलार, मोहन शेलार ,प्रतमेश तुपे व इतर समाज बांधव व श्री संत सेना नाभिक सेवा संघ, राजूर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
राजूर शहरात संत सेना महाराज यांची पुण्यतिथी सोमवारी उत्सवात करण्यात आली. तसेच भजनी मंडळ, पारंपरिक वेशातील स्त्री-पुरुष यात सहभागी झाले होते.
रेणुका माता देवी येथून संत सेना महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
येथील मंदिरा विठ्ठल-रुख्मिणी व संत सेना महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. दुपारी संत सेना महाराजांची आरती साजरी होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते संतांनी दाखविलेला कल्याणाचा मार्ग, दिलेले ज्ञान, उपदेश जर प्रत्यक्षात आचरणात आणले तर लोककल्याण चळवळ यशस्वी होईल