सोलापूर शहर व जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी’नंदीध्वज बनवा’..’जिंका बक्षीसे’.!

.
.
श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम व पद्मकमळ प्रतिष्ठान चा पुढाकार.
सोलापूर : सोलापूरातील ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांचे यात्रेचे वेध सर्वांनाच लागले आहे. (गड्डा जत्रा) यात्रा परंपरेप्रमाणे १४ जानेवारी २०२५ रोजी होत आहे. जत्रेचे मुख्य आकर्षण आणि प्रमुख ‘अक्षता सोहळा’ साठी नंदीध्वजांची मिरवणूक पाहण्यासाठी जगभरासह, स्थानिक, महाराष्ट्रातील, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आधी राज्यांतून भाविक भक्त येतात.
म्हणूनच आम्ही यावर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘नंदीध्वज स्वत: बनवा’ आयोजित करत आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण व्हावा, ह्या येतूने
ही स्पर्धा ५ वी ते १० वीच्या शहर व जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवार दि. २९ डिसेंबर रोजी सोलापूरात आयोजित केले आहे.
‘नंदीध्वज स्वतः बनवा स्पर्धा’ नियम..
१) सोलापूरातील कुचन प्रशाला येथे
२) रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी
१०. ३० वाजता सुरु होईल.
३) स्पर्धा वेळेवर सुरु केले जाईल,
वेळेनंतर आलेल्या स्पर्धकांना सहभाग घेता येणार नाही.
४)स्पर्धक विद्यार्थ्यांनी सर्व साहित्य स्वत: आणावयाचे आहेत.
५) दीड तासांची वेळ देण्यात येईल.
६) नंदीध्वजाचे साईज किमान २-३ फुटाचे असावेत.
७) सहभागी होणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांना ‘प्रमाणपत्र’ देण्यात येईल.
८) मुली व मुलांसाठी ‘स्वतंत्र’ गट असेल.
९) प्रवेश फी वीस (२०₹) रुपये असून स्पर्धेच्या ठिकाणीच स्वीकारले जाईल.
प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ दोन्ही गटांसाठी (स्वतंत्र) ३ – ३ आकर्षक बक्षीसे दिले जाईल.
(एकूण ६ + ६ बक्षीसे) अंतिम निर्णय परीक्षकांचा असेल. अशी माहिती, पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम व पद्मकमळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी दिले आहे.
ही स्पर्धा फाउंडेशन व सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या संकल्पनेतून घेण्यात येत आहे.
या स्पर्धेत शहर व जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावेत असे आवाहन, फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती – नागेश पासकंटी – नागेश सरगम, सल्लागार सुकुमार सिध्दम – दयानंद कोंडाबत्तीनी, समन्वयक श्रीनिवास रच्चा – किशोर व्यंकटगिरी, सदस्य श्रीनिवास पोटाबत्ती, वैकुंठम जडल, सखी संघमच्या सचिवा पूजा चिप्पा, उपाध्यक्षा मंजुळा आडम – कल्याणी पेनगोंडा, सहसचिवा लक्ष्मी कोडम, खजिनदार आरती बुधाराम, सहखजिनदार विद्या सिंगम, कार्याध्यक्षा अन्नपूर्णा सोमा, सहकार्याध्यक्षा आरती आडम, समन्वयिका गीता भूदत्त – कला चन्नापट्टण, मार्गदर्शिका प्रा. सपना मिठ्ठापल्ली, सल्लागार ममता मुदगुंडी – सीमा यलगुलवार – कल्पना अर्शनपल्ली, कार्यकारिणी सदस्या वनिता सुरम, ॲड. मेघना मलपेद्दी, भाग्यश्री मडूर, हेमा मैलारी, पद्मा मेडपल्ली, पल्लवी संगा, सोनाली तुम्मा, विद्या श्रीगादी, तसेच ‘पद्मकमळ’चे रमेश कंदीकटला, जवाहर मंगलपल्ली, श्रीनिवास दुभास, आनंद दुडम, श्रध्दानंद गुंडला, दिगंबर कुरापाटी, कुमार उसाकोयल, लक्ष्मीदास भंडारी, अंबादास कट्टा, गोविंद बत्तुल यांनी केले आहे.