टाकळीढोकश्वर येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार कृतीतून आचरणात आणावे !
बाळासाहेब खिलारी
दत्ता।ठुबे
पारनेर:प्रतिनिधी
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी मोठ्या कष्टाने समाजोद्धाराचे काम काम केले आहे. प्रत्येक मनुष्याला त्याचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी कर्मकांड समाजाविरोधात लढा उभा करुन न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण आपण कायम ठेवले पाहिजे. समाजोन्नत्तीच्या कार्यातून त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीतून आचरणात आणले गेले पाहिजे. टाकळीढोकश्वर येथिल महात्मा फुले चौक येथे आज सकाळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अशा उपक्रमातून त्यांचे कार्य आपण लोकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी या वेळी केले.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा फुले चौक येथे श्री संत सावता माळी मित्रमंडळाने व महात्मा फुले मित्रमंडळाने या पुर्वी विविध कार्यक्रमांचे सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले आहे. या वेळी नुकताच जाहीर झालेल्या पत्रकारीतेचा राज्यस्तरीय जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित झालेले पत्रकार श्रीकांत चौरे व पत्रकार वसंत रांघवन यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचाही सत्कार या वेळी सर्व उपस्थितांच्या वतीने करण्यात आला . याप्रसंगी निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष मळिभाऊ रांधवण, माजी उपसरपंच सुनील चव्हाण, जयशिंग झावरे, उपसरपंच रामभाऊ तराळ, पत्रकार संतोष कोरडे, पत्रकार वसंत रांधवण,पत्रकार विजय वाघमारे ,विनोद गोळे , शरद झावरे,श्रीकांत चौरे, संदीप चौधरी,
विलास धुमाळ, विलास ठुबे, प्रकाश इघे, राहुल झावरे सर, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण पायमोडे, शिवानी मॅनेजमेंटचे विक्रमशेठ झावरे, मेजर संजय खिलारी, मेजर शिवाजी पायमोडे,भिमाप्पा लाॅन्सचे अशोक पायमोडे,शिराज हवालदार, संदिप चौधरी, राजेंद्र चौधरी, मोहरावर रांधवण, आदित्य रांधवण, अविनाश रांधवण, सागर रांधवण, शिवाजी चौरे, बाजीराव गोरडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निवडुंगे आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.