भातकुडगाव फाटा येथे दोन तास चक्का जाम, शेतकरी रस्त्यावर:

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी,
शेवगाव तालुक्यातील ज्वलंत प्रश्न संदर्भात लोकप्रतिनिधीला लक्ष देण्यास वेळ नाही.भातकुडगाव फाटा,भायगाव शहरटाकळी परिसरात झालेल्या अवकाळी गारपिटीने व वादळी तडक्यात सर्व पिके जमीन दोस्त झाली. आणि फक्त गहू, कांदा पिकाचे पंचनामे सुरू झाले आहे. हा कुठला न्याय आहे.शेतात उभ्या सर्व रब्बी हंगामातील पिकाचे पंचनामे दोन दिवसात सरसकट करून तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. सध्या तालुक्याला लाभलेले लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरचा संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी केले.
शेवगाव तालुक्यात अवकाळी पावसाने व गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत. तसेच, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी. वादळाने पडलेले विजेचे खांब. तुटलेल्या विजेच्या तारा. त्वरित दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करावा. कांद्याला २० रुपये प्रति किलो प्रमाणे हमीभाव शासनाने नाफेड मार्फत खरेदी करून द्यावा. कांदा अनुदान मुदत ,३० जून पर्यंत शासनाने वाढवावी. मागील वर्षाचे अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावे. यापुढे एकत्रीत संघटीतपणे आपल्या प्रश्नाला लढा द्यायचा आहे आणि आपले हक्काचे प्रश्न आपल्याला मिळवायचे आहेत,या तालुक्याच्या लोकप्रतिनिधिनी पाहणीचा फार्स केला आहे ,पण आता आपण एकत्रित झालो आहोत, आणि आपल्याला आपले हक्क मिळण्यापासुन कोणीही रोखु शकत नाही.यावेळी क्षितिजभैय्या घुले पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी होत असलेली दिरंगाई बद्दल जाब विचारण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. क्षितिज घुले बोलत होते.
यावेळी आव्हाणे, वाघोली,ढोरजळगाव शे, मलकापुर, गरडवाडी ,आपेगाव यागावात देखील नुकसान झालेले आहे. या गावाचा समावेश केलेला नाही. तो समाविष्ट करावा याची मागणी केली. प्रशासन व आधिकारीनी लेखी अश्वासन दिले. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजुभाऊ कोळगे, युवक अध्यक्ष नंदकुमार मुंढे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अनिलराव मडके,पंडीतकाका भोसले, माऊली निमसे,अशोक मेरड,युवा नेते राजेंद्र आढाव,लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सखाराम लव्हाळे, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, शंकरराव नारळकर,राजेंद्र देशमुख,डॉ सुधाकर लांडे,राजेंद्र फंटागरे, बबनराव भुसारी ,कांता निकम,आंबादास कळमकर, विठ्ठल फंटागरे,शंभु गवळी,प्रविण मरकड,भाऊराव माळवदे,लतिफ पटेल,भरतराव वांढेकर,संतोष राव मेरड,प्रदिप काळे,शाहादेव खोसे,दादापाटील उगले,गणेश खंबरे,युवराज भोसले,राजेंद्र चव्हाण,आण्णा शिंदे, विकास नन्नवरे,माऊली जगताप संतोष पावसे,अमोल कराड,भागवत बडे,संकेत वांढेकर ,विठ्ठलराव प्रल्हाद आढाव, अनिल लांडे,अभिजीत आहेर,दिपक चोपडे,दिपकराव देशमुख, क्रुष्णा पाटेकर,अर्जुन दराडे,यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.