सुषमा अंधारे यांचे वर गुन्हा दाखल करा चोपडा पोलिसांना दिले निवेदन!

चोपडा (जळगाव) दि ११
राम भक्त शबरी माता यांच्या विषयी अपशब्द वापरून विटंबना करणाऱ्या ठाकरे गटातील शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल करावा आशा मागणीचे निवेदन शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संस्थेने चोपडा पोलिसांना दिले आहे
निवेदनात म्हटले आहे की सन 2015 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
समारोहात नागपूर या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी रामभक्त शबरीमाता च्या विषयी अपशब्द वापर करत म्हटले की १४ वर्ष वनवासात असताना रामाचे शबरी शी अनैतिक संबंध होते.” असे वक्तव्य करून रामभक्त शबरी माता चा अपमान केला आहे
शबरी माता या आदिवासींचे दैवत आहे त्यांचा अपमान केल्यामुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
सुषमा अंधारे यांनी जरी 2015 मध्ये हे वक्तव्य केले असले तरी हा व्हिडीओ आज स्थितीत व्हायरल झाल्यामुळे आमच्या आदिवासी समाजाच्या निदर्शनास आले आहे. कोणीही येतात आणि आपली प्रसिद्धी मिळविण्यासाठी आदिवासीचे व आदिवासी दैवतांचे अपमान करू पाहतात यापुढे कोणीही आदिवासी व आदिवासी देवतांचे विडंबना करणार नाही यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटातील उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावरती अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत आदिवासी दैवत शबरी माता यांचे विटंबना केल्यामुळे गुन्हा दाखल व्हावा
अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी समुदाय रस्त्यावर उतरेल आणि मोर्चे, आंदोलन निदर्शने करतील याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल असा इशारा शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक विठ्ठल बर्डे यांनी दिला आहे या पार्शवभूमीवर काल चोपडा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पोलिसांना हे निवेदन दिले
शबरी माता भिल्ल आदीवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे सर्वे कार्यकर्ते यांनी चोपडा पोलिस स्टेशनला निवेदन दिले
यावेळी चोपडा तालुका शबरी माता भिल्ल आदिवासी भिल्ल समाज विकास संस्थेचे तालुका अध्यक्ष गोपाल मोरे यांचे सह चोपडा, हिंगोना कजोरने ,सत्रासेन गावचे कार्यकर्ते उपस्थित होते
