नेवासा तालुका वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी अभिषेक जाधव महाराज

विजय खंडांगळे
सोनई – महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुकाध्यक्षपदी हभप अभिषेक जाधव महाराज यांची एकमताने निवड .करण्यात आली. तशा निवडीचे पत्र निवड वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच देण्यात आले
.हभप जाधव महाराज यांची तरुण पणाची क्रेझ समाजाला पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे,धार्मिक कार्यक्रमात ते सतत अग्रेसर राहतात,या कार्याची दखल घेत नेवासा तालुका अध्यक्ष पदाची धुरा जाधव महाराज यांच्या खाद्यावर टाकण्यात आली आहे.
तसेच संघटनेच्या माध्यमातून समाज प्रबोधन , गाव तेथे हरिपाठ, मंडळ स्वच्छतेचा जागर ,अशा प्रकारचे विविध कार्यक्रम सतत राबवत आहेत.या निवडीचे वारकरी संप्रदाय मधील पदाधिकारी,विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.