लातूर जिल्ह्यातील रुग्णवाहिका बंद ठेवण्याचा चालकांचा इशारा!

लातूर प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका ड्रायव्हर यांना वेतनेतर अनुदान दिले जात नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे रुग्णवाहिका सेवा बंद ठेवण्याचा इशारा रुग्णवाहिका चालकांनी दिला आहे तसे निवेदन त्यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांच्याकडे दिले आहे
निवेदनात म्हटले आहे की दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी पासून csc e -governance sevices India limited या कंपनी मार्फत वहान चालक म्हणून जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेमणूक झालेली आहे. आशा कर्मचाऱ्यांना वेतनेतर अनुदान दिले जाते हे वेतनेत्तर आजर्यंत मिळाले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. तात्काळ वेतन द्यावे अन्यथा अंबुलन्स सेवा बंद ठेवण्याचा इशार ड्रायव्हर यांनी दीला आहे.
लातूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रचे रुग्णवाहिका(अंबुलन्स) ड्रायव्हर पानचिंचोली संगादेव क्षिरसागर, खरोळा गजानन सोमवंशी, चापोली मनोज शिंदे, पानगाव जयदीप आचार्य, बोरी ईश्वर शिंदे, किनगाव विश्वजित वाहुळे, चापोली ( ब ) सुधाकर गायकवाड, जवळगा ( पो ) समाधान फत्तेपुरे, वलांडी नंदकुमार सोमवंशी, साकोळ युनुस नुरुने, हलगरा सोपान बोयणे, औराद (शा) बाबू मावले, पोहरेगाव नारगुंडे ओमकार, वाढवणा प्रेमदास राठोड, हंरगुळी सलमान पठाण, रामलिंग मुगदड गाजीबाबुमिया शेख आदी अंबुलन्स ड्रायव्हर यांच्या निवेदनावर सहया आहेत.

