चंद्रकांत वेलजाळी यांचे हृदयविकाराने निधन

अकोले /प्रतिनिधी
वावी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच कैलासवासी चंद्रकांत (कांताशेठ )रघुनाथ वेलजाळी वय 64 यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.
ते अतिशय मनमिळाव स्वभावाचे होते त्यांच्या पार्थिव देहावर वावी येते स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
ते वावीचे माजी सरपंच,सेवा संस्था व पतसंस्थेचे संचालक म्हणून काम पाहत होते गणेश अक्कचे चालक त्याच बरोबर गावातील तालुक्यातील सामाजिक,धार्मिक,व राजकीय क्षेत्रात त्यांचा विशेष दबदबा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ,चार बहिणी दोन मुले, एक मुलगी, जावई, सूना, भाचे नातवंडे पुतणे असा परिवार आहे अकोले येथील भाजपचे तालुका सरचिटणीस ग्राहक पंचायत चे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक बाळासाहेब मंडलिक भरत मंडलिक यांचे ते मेहुणे होते.