इतर

हायकोर्टाचा ठाकरे गटाला दणका

मुंबई- महापालिकेच्या प्रभाग रचनेला आव्हान देणारी ठाकरे गटानं दाखल केलेली याचिका मुंबई हयकोर्टानं फेटाळली आहे. हा ठाकरे गटाला मोठा झटका मानला जात आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता प्रभागांची संख्या २२७ इतकीच कायम राहणार आहे. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुकरे, न्या. एम. डब्ल्यू. चंदवाणी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. याचिकेत काही तथ्य नसल्याची टिप्पणीही खंडपीठानं केली आहे.

मविआ सरकारनं मुंबई महापालिकेतील 227 वॉर्ड संख्या वाढवून 236 करण्यात आली होती. हा नियम फक्त मुंबई महापालिकेसाठीच होता. कारण या महापालिकेसाठी वेगळा कायदा आहे. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं ही रचना बदलून पूर्वीचीच २२७ वॉर्ड संख्या कायम ठेवली होती.

पण निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे राजू पेडणेकर यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. याप्रकरणाची दखल घेऊन प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेसंदर्भातील सुनावणी 18 जानेवारी रोजीच पूर्ण झाली होती. त्यानंतर हायकोर्टानं आपला निर्णय राखून ठेवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button