शिवाजीराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष, जनशक्ती उद्योग समूह व जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड.डॉ.विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह व अर्पण ब्लड बँक, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०९:०० वा शेवगाव येथील निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जनशक्ती विकास आघाडीचे महासचिव जगन्नाथ गावडे यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली.
पुढे बोलतांना गावडे म्हणाले की, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी रक्तदान केले पाहिजे. रक्तदान करून आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदान देऊ शकतो. प्रत्येक रुग्णांना रक्ताचा वेळेला पुरवठा होत नाही, पर्यायाने त्यांना आपला जीव गमवावा लागतो. रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. मोठ्या सर्जरीमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत अथवा गरोदर स्त्रियांना रक्त मिळाल्यास प्राण वाचण्यास मदत होते. रक्तदान केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीराला चैतन्य निर्माण होते. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करावे असे आवाहनही यावेळी जगन्नाथ गावडे यांनी यावेळी केले.