अकोल्यात उद्या अशोकराव भांगरे यांची शोकसभा.

अकोले प्रतिनिधी
लोकनेते अशोकराव यशवंतराव भांगरे यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी अकोले ( महाराजा लाॅन्स )येथे बुधवार दिनांक १८/१/२०२३रोजी १२.००वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे
अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकराव भांगरे यांचे गुरुवारी (दि 12) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला यावेळी त्यांना तातडीने घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला
माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पारंपरिक विरोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते सलग पाच विधानसभा निवडणुका त्यांनी मधुकर पिचड यांच्या विरोधात लढल्या त्यात त्यांना प्रत्येक वेळी पराभवाला सामोरे जावे लागले असे असताना देखील त्यांनी कधीही हार न मानता त्यांनी खंबीरपणाने पिचड विरोधक म्हणून राजकारणात भूमिका साकारली पंचायत समिती सदस्य सभापती , जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती ,अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले त्यांच्या जाण्याने सम्पूर्ण तालुका हळहळला आहे त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी सर्व पक्षीय शोकसभा आयोजित केली आहे
स्व.लोकनेते अशोकराव यशवंतराव भांगरे यांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व पक्षातील नेते पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे.असे आवाहन स्व.लोकनेते अशोकराव भांगरे मिञ परिवार अकोले यांचे वतीने करण्यात आले आहे
