पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती येथे आरोग्य शिबीर संपन्न

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के यांच्या पुढाकारातून मंगळवार दि.18 रोजी रुई छत्रपती येथील ग्रामपंचायत मध्ये निसर्ग उपचार केंद्र राळेगणसिद्धी येथील समूहाचे शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये रुई छत्रपती तसेच पंचक्रोशीतील शेकडोच्या संख्येने रुग्णांनी सहभाग नोंदवला व अनेकांच्या आजाराचे निदान ही करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना जिल्हाध्यक्ष नितीन मस्के, तसेच सरपंच मच्छिंद्र दिवटे, घाणेगाव सरपंच दादा भाऊ शेलार, शिरीष वाबळे, सचिन औचीते, प्रमोद डोळ, श्याम शिंदे, शेखर साबळे, दादा अवचिते, विद्या डोळ, शशिकला कोतकर, विमल अवचिते, लक्ष्मीबाई बनकर, सुशीला वैष्णव तसेच डॉ. राजेश औटी यांचे विशेष मालाचे सहकार्य लाभले , तसेच डॉक्टरांच्या संपूर्ण स्टाफचे ग्रामपंचायत रुई छत्रपती तसेच ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.