आलाराम वाजला अण देशी दारूचे दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला !
नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटे गजाआड !
कोतुळ / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे सरकार मान्य देशी दारूचे दुकान फोडन्याचा प्रयत्न फसला नागरिकांच्या सतर्कते मुळे चोरट्या ना दुकानात कोंडले आणि पोलिसांच्या हवाली केले
दिनांक 22 /४/२०२३ रोजी पहाटे दोन वाजता चोरट्यांनी कोतूळ येथील सरकारमान्य देशी दारूचे दुकानाचे दरवाजे कुलूप तोडून आत प्रवेश केला दरवाजे तोडून आत प्रवेश करतात त्यांनी सीसीटीव्हीचे ची मोड तोड केली त्याच वेळी दुकान मालकाचे घरी मोबाईल वर आलाराम वाजला चोरट्यांनी कॅमेरा तोड ल्या मुळे दुकान मालकाला घरी झोपेत असताना आलाराम चा आवाज आला रात्री दुकानात कोणीतरी प्रवेश केल्याचे मोबाईल कर समजले यामुळे दुकान मालक सावध झाला त्यांनी तातडीने आपले सहकारी ग्रामस्थांना घेऊन दुकानाला घेराव घातला आणि चोरट्यांना दुकानातच कोंडले यामुळे दुकानातील चोरी होणारा लाखो रुपयाचा माल यावेळी बचावला यापूर्वी याच दुकानात चार ते पाच वेळा दुकान फोडून देशी दारूचे बॉक्स व रोकड लांबविले गेले होते या घटनेचा तपास लागला नाहीं सातत्याने या ठिकाणी होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी दुकान मालक श्री शिवाजी तुकाराम देशमुख यांनी यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे आणि आलाराम सिस्टीम बसविल्याने चोर रंगेहात पकडले गेले आणि तात्काळ या घटनेची माहिती त्यांनी पोलीस स्टेशनला दिली पोलिसांनी तातडीने या ठिकाणी हजर होत या आरोपींना ताब्यात घेतले तानाजी रामभाऊ जाधव व गोरख दगडू डोके राहणार पिंपळगाव खांड तालुका अकोले येथील या दोघा तरुणांना यावेळी पोलिसांनी अटक केली गजाआड केलेल्या चोरट्यांच्या चौकशीतून धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत सावरचोळ फाटा येथे बेकायदेशीर पणे सुरू असलेल्या एका हॉटेल (ढाबा )चालकाच्या सांगण्यावरून देशी दारूच्या दुकानात चोरी करत असल्याची खळबळजनक माहिती या चोरट्यांनी दिली या दुकानातून बॉक्स चोरून आणून एक हजार रुपयाला या हॉटेल चालकाला विकली जात असल्याचे पुढे आले आहेब यामुळे अनधिकृत रित्या सुरू असलेल्या या हॉटेल चाल काकडून गुन्हेगारांना पाठबळ दिले जात असल्याचे उघड झाले आहे पोलीस आता या अनधिकृत ढाबा चालकांवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे अनधिकृत ढाब्या वर देशी-विदेशी दारू विक्रीसाठी चोरांना हाताशी धरून आपले उखळ पांढरे करत आहे कोतुळ येथील शासनमान्य दारूच्या दुकानाचे चालक श्री शिवाजी तुकाराम देशमुख यांनी अकोले पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे यात म्हटले आहे की मी दिनांक 21/4/2023 रोजी रात्री 9 वा सरकारमान्य देशी दारूचे दुकान बंद करून घरी गेलो 22/4/2023 रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मोबाईल वर आलाराम वाजू लागला त्यावेळी माझे पुतणे अभिषेक ,व कौस्तुभ यांनी मला सांगितले दुकानात कोणीतरी चोरीचा प्रयत्न करत असल्याची माहिती समजल्यावरून आम्ही सर्वजण रात्री दुकानाजवळ आलो असता सीसीटीव्ही तोडल्याचे दिसून आले दुकानाचे दरवाजे उघडे असल्याचे दिसले यावरून आम्ही आत चोर असल्याची शंका आल्याने दुकान भोवती गरडा करून चोर आत कोंडून ठेवले आत घुसलेले दोन्ही इसम गोरख दगडू डोके। व तानाजी रामभाऊ जाधव यांना विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी आम्ही सावर चोळ फाटा येथील एका हॉटेल चालकाच्या सांगण्यावरून या ठिकाणी चोरी करण्यासाठी आल्याचे सांगितले एक हजार रुपये बॉक्स प्रमाणे त्याने त्याला हे बॉक्स विक्री करतो असे सांगितल्या ची कबुली दिली अकोले पोलिसांनी या इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 कलम 380,457,427,511 याप्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गोराणे हे पुढील तपास करत आहेत
————/