ध्येयवादी व्यक्तींना यश लवकर भेटते- रविंद्र आहेर
अकोले/प्रतिनिधी-
आपल्या ध्येयाकडे न थांबता,न थकता जो व्यक्ती चालत राहतो त्याला ध्येय कधीच दूर नसते.म्हणूनच ध्येयवादी व्यक्तींना यश लवकर भेटते.असे रविंद्र आहेर (संशोधक युके इंग्लंड) यांनी प्रतिपादन केले.
सत्यनिकेतन संस्थेचे सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे येथे वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे सचिव टी.एन. कानवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी संशोधक रविंद्र आहेर विचार मंच्यावरून बोलत होते.
याप्रसंगी बँक मॅनेजर गणेश आंबरे,मेजर दत्तात्रय डगळे,बायफचे विभागीय अधिकारी रामनाथ नवले,संचालक मिलिंदशेठ उमराणी,प्रकाश टाकळकर,श्रीराम पन्हाळे,व्यवस्थापक प्रकाश महाले,शिक्षण निरिक्षक लहानु पर्बत,माजी प्राचार्य अंतुराम सावंत, सरपंच गणपत डगळे,उपसरपंच सुभाष बेणके,सदस्या गौतमी पराड,शालेय समितीचे सदस्य दिनेश शहा,त्रिंबक पराड,जयवंत पराड,अमोल शिंदे,प्राचार्य मधुकर मोखरे,लिपिक भास्कर सदगिर यांसह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी,पालक उपस्थित होते.
रविंद्र आहेर यांनी पुढे मार्गदर्शन करताना जिवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी ठेवा.सकारात्मक विचार ठेवा.हेच विचार ध्येयाप्रती पोहोचवण्यास मदत करतात.अपयशाची भिती न बाळगता तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष टी.एन.कानवडे यांनी जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द,मेहनत,संयम आणि विश्वास अंगी बाळगून घ्या.दुर्गुण झटकून अथक परिश्रम करा.न्यूनगंड बाजूला करा.स्वतःवर विश्वास ठेवा.पुढे जाताना कधीतरी मागे वळून पहा असे विचार व्यक्त केले.
बँक मॅनेजर गणेश आंबरे यांनी प्रत्येकाच्या जिवनात अनेक संधी येत असतात.त्यातील योग्य संधी ओळखून त्या संधीचे सोने करा.आयुष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रीत करा.असे विचार व्यक्त केले.
उपसरपंच सुभाषशेठ बेणके यांनी योग्य वेळी योग्य दिशेने धोरणासह केलेले सर्व प्रयत्न यशाचा मार्ग उघडतात.याप्रमाणे विद्यालय हे आमच्या गावाचा,कुटुंबाचा एक घटक असुन यासाठी विकासात्म कामे पुर्णत्वास नेण्यास ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.
बायफचे रामनाथ नवले यांनी मेहनत करून स्वतःचे नशीब घडवा.ध्येय गाठण्यासाठी वेळ निश्चित करा.शिक्षण हेच विकासाचे केंद्रबिंदू माना.असे विचार व्यक्त केले.
यावेळी वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य संपादन केलेल्या विदयार्थ्यांना टॉफी,प्रशस्तीपत्रक व शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य मधुकर मोखरे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. रामदास डगळे यांनी केले.तर प्रा.विक्रम आंबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.