जाणता राजा प्रतिष्ठाणचे समाजरत्न पुरस्कार राष्ट्रीय एकात्मतेला बळ देणारे-महंत रमेशानंदगिरीजी

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
सर्व धर्मीय साधु संतांचे हस्ते भानसहीवऱ्यात पुरस्कारांचे वितरण समाजातील विविध क्षेत्रात दिशादर्शक कार्य करणाऱ्या विविध जाती धर्माच्या लोकांना दरवर्षी जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठान समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करत आहे.
यामुळे प्रामाणिक काम करणाऱ्या गुणवंतांना जोमाने काम करण्यासाठी हत्तीचे बळ मिळते आहे आणि या साठी सर्व धर्मीय लोकांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम जाणता राजा प्रतिष्ठाणने केले हे कौतुकास्पद असुन त्यांचे हे समाजरत्न पुरस्कार राष्ट्रीय एकात्मतेला बळ देणारे आहेत. असे गौरवोद्गार त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
भानसहिवरे या.नेवासा येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठान यांचे वतीने मातोश्री स्व.द्वारकाबाई मारुतराव मोहिटे पाटील यांचे स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या यंदाच्या सन२०२३च्या समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई मुरकुटे, मौलाना हाफीज सुल्ताना शेख, यळमकर महाराज,महंत आवेराज महाराज,वंजारे पाळक, माजी उपसभापती किशोर जोजार, तुकाराम काळे, तुकाराम भणगे, देविदास साळुंके, विश्वास काळे, ज्ञानेश्वर पेचे, निरंजन डहाळे, मनोज पारखे, अंकुश काळे, अंबादास कोरडे, सोमनाथ शेंडे, बाळासाहेब भणगे, संदीप आलवणे,अभिषेक पटारे,अशोक कोळेकर,भाऊसाहेब फुलारी, जना जाधव, अशोक टेकणे, प्रतापराव चिंधे, त्रिंबक भदगले, नरेंद्र काळे, जयंत मोटे,मानव साळवे, आरीफ शेख, चांगदेव दारूंटे, अस्लम सय्यद, अमोल साळवे, ज्ञानेश्वर मोटकर, अय्यआज देशमुख, राजेंद्र शेटे,अशोक टाके, संजय तुपे, सिताराम भणगे,याचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, आशाताई मुरकुटे, अंकुश काळे, आवेराज महाराज, पत्रकार शहाराम आगळे यांचेसह अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बोलतांना सर्वांनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव मोहिटे यांच्या सामाजिक कामावर व सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन गावातील जातीय सलोखा वाढवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या कामावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
समाजरत्न पुरस्काराने गौरव
जाणता राजा प्रतिष्ठान यांच्यामार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अकरा च्या.यामध्ये कुमार गर्जे (कृषी क्षेत्र), कैलास शिंदे (कृषी उद्योग क्षेत्र), शहाराम आगळे (पत्रकरिता )निता आनंदकर (शिक्षण क्षेत्र),वर्षा शेटे (गुणवंत शिक्षिका )डॉ. जगन्नाथ नरवडे (वैद्यकीय क्षेत्र )शिवाजी सोनवणे (पशुवैद्यकीय सेवा ) शरद चेचर (महावितरण )मनीषाताई धनापुणे (राज्य कबड्डी संघ क्रीडाक्षेत्र )अशोक पेहरकर व रंजना पेहरकर (आदर्श माता पिता )या मान्यवरांना विविध राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत व साधुसंतांच्या शुभ हस्ते यांना समाज रत्नपुरस्कार देऊन गौरवण्यात आले