इतर

वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रश्नां बाबतीत भारतीय मजदूर संघ ऊतरला रस्त्यावर

जळगाव – वीज उद्योगात वर्षानुवर्षे कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व उचित कौशल्य प्राप्त केलेल्या या वीज कंत्राटी कामगारांना केवळ शैक्षणिक अहर्ता नसल्यामुळे जळगाव सर्कलचे प्रभारी अधीक्षक अभियंता .मार्के साहेब यांच्या सुचनेअंती 200 कामगारांना कंत्राटदारांनी कमी केले होते.
दि 12 डिसेंबर पासून महावितरण कंपनीच्या कार्यालय समोर आंदोलन चालू केलं होतं या बाबतीत महावितरण कंपनी प्रशासन कोणतेही प्रतिसाद देत नव्हते.
या बाबतीत भारतीय मजदूर संघ जळगाव विभाग संघटक मा.सुरेश सोनार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन भारतीय मजदूर संघाच्या झेंड्याखाली येऊन न्याय देण्या साठी संर्घघ करण्याचे आवाहन केले होते.
मधील काळात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे पदाधिकारी यांनी महावितरण कंपनी चे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री संजय ढोके यांच्या समावेत चर्चा करून मागिल काळात व्यवस्थापकयी संचालक यांचा समावेत झालेल्या बैठकीचा दाखला देवुन फक्त शैक्षणिक दृष्ट्या अपात्र जुन्या व अनुभवी कामगारांना कामावरून कमी करू नये अशी आठवण करून दिली.
या पार्श्वभूमीवर दि 25 जानेवारी 2023 रोजी मा सहाय्यक कामगार आयुक्त जळगाव यांना कामावरून कमी केलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी मागणी केली आहे.
या वेळी सविस्तर चर्चा होवून मा. सहाय्यक कामगार आयुक्त यांनी महावितरण प्रशासनाला लेखी पत्राव्दारे कळविण्यात आले आहे मागील 5/ 10 वर्षा पासून कंत्राटी कामगारांना व्यापक अनुभव आहे. या कामगारांना ऐक वर्षांची मुदत दिल्यास आवश्यक शैक्षणिक अहर्ता पुर्ण करून हमी पत्र देण्यास तयार आहे. तेव्हा सदरील सर्व कामगारांना पुर्ववत कामावर रुजू करून घेण्यात यावे अशा लेखी सुचना महावितरण कंपनीला मा.सहाय्यक कामगार आयुक्त श्री बिरार यांनी दिल्या आहेत. या वेळी महावितरण प्रशासनाच्या वतीने मा.तन्वी मोरे, मा.पराग बडगुजर व मा चौधरी व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे , प्रवीण अमृतकर, सचिन लाडवंजारी, विकास चौधरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शासनाने दिलेल्या पत्रात चालू असलेल्या सामुहिक उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे याला सकारात्मक प्रतिसाद देवुन उपोषणकर्ते कामगारांना पाणी देवुन उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
या वेळी झालेल्या सभेत राज्यातील सर्व कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) सतत प्रयत्नशील आहे. जळगाव जिल्हा मधील सर्व कामगारांनी एकजुटीने, विश्वासाने संघटनेच्या सोबत ऊभे राहुन संर्घघ करावा. या बाबतीत स्थानिक प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर संघटना मा. ऊर्जा मंत्री,ऊर्जा सचिव पातळीवर दाद मागणार आहे,जो पर्यंत जुन्या अनुभवी कामगारांना कामावर घेत नाही तो पर्यंत विविध लक्षवेधी आंदोलने करण्यात येतील असे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात , सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी ईशारा दिला आहे. या वेळी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवीण अमृतकर, जळगाव जिल्हा भारतीय मजदूर संघ चिटणीस सचिन लाडवंजारी, कार्याध्यक्ष विकास चौधरी, माऊली पाटील, कंत्राटी कामगार नेते विजय वराडे, खलीलउद्दीन शेख, संतोष सोनवणे, अनिल नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button