संदीप सातपुते यांना अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते समाज रत्न पुरस्कार..!!

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील सायखिंडी विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक संदीप भानुदास सातपुते यांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनमोल कार्याबद्दल प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील देवराम दादा गोडगे प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाजरत्न पुरस्कार २०२५ चे वितरण प्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे करण्यात आले.
यावेळी मकरंद अनासपुरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शहरी व ग्रामीण ही दरी आज संपलेली आहे. विद्यार्थी व शिक्षक खूप मेहनत घेत आहेत त्यामुळे गुणवत्ता सुधारत आहे. देशभक्तीची सुरुवात प्रत्येक व्यक्तीने स्वतः पासून करायला हवी. वृक्षारोपण अधिक व्हावे, सर्वांनी व्यसनांपासून दूर राहावे, कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न केला जावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अन्याय, अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष डॉ. नंदकुमार गोडगे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अँड अविनाश उगले ,उद्योजक भारत मुंगसे, दुध संघ संचालक विलास वर्पे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते ह.भ.प. शरद महाराज ढवळे यांनी केले. सदर कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते