केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द !

🔹नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा उद्याचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. उद्या दोन दिवसांसाठी शहा नागपूरमध्ये येणार होते. हा दौरा महत्वाचा मानला जात होता कारण यावेळी ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार होते. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.
उद्या नागपूरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होतं. यावेळी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार होते. पण अचानक दौरा रद्द झाल्यानं आता हा उद्घाटन कार्यक्रम शहांच्या उपस्थितीशिवाय होणार आहे. राज्यात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा महत्वाचा मानला जात होता. पण अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्यानं तर्क-वितर्क वर्तवले जात आहेत.
दरम्यान, अमित शहा नुकतेच महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावेळी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. नवी मुंबईतील खारघर इथं हा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी देखील त्यांनी दोन-तीन कार्यक्रम उरकले होते. त्यानंतर पंधरा दिवसांमध्ये ते पुन्हा नागपूरच्या दौऱ्यावर येणार होते. राजकीय दृष्ट्या त्यांचा हा दौरा महत्वाचा होता. हा दौरा रद्द होण्यामागचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.