घाटघर आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिन साजरा!

संजय महानोर
भंडारदरा / प्रतिनिधी
अतिदुर्गम भागात आदिवासी समाजाच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीकोनोनातुन १९७४ साली स्थापन झालेल्या शासकिय माध्यमिक आश्रमशाळा , घाटघर येथील यावर्षीचा प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत एक अलग पायंडा निर्माण केला आहे .
प्रजासत्ताक दिन व कोणताही राष्ट्रीय सन साजरा करताना एखाद्या विशेष पाहुण्यास आमंत्रित करण्याची प्रथा आहे .पंरतु घाटघर येथील शासकिय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अजय वाघ व अधिक्षक रियाज दुंगे यांनी सेवानिवृत्तीच्या वाटेवर असणा-या व आपल्याच शाळेत काम करणा-या कर्मचा-याच्या हस्ते ध्वजारोहन करण्याचे ठरविले .त्यानुसार शाळेचे कर्मचारी उल्हास गांगड यांच्या हस्ते घाटघर शाळेवर प्रजासत्ताक दिनाचा तिरंगा फडकवण्यात आला . त्यावेळी विद्यालयाच्या सर्व कर्मचा-यांच्या वतीने उल्हास गांगड यांना सन्मानित करण्यात आले .उल्हास गांगड यांनी आदिवासी भागासाठी शाळेच्या माध्यमातुन २७ वर्ष सेवा दिली .
माझ्या २७ वर्षाच्या कालावधीत मला माझ्या भारत देशाचा तिरंगा फडकविण्याचा माझ्याच शाळेत मान मिळाला हा क्षण मी कदापीही विसरु शकणार नाही असे उद्गार यावेळी त्यांनी काढले .तर लोकांची , विद्यार्थ्यांची समाजसेवा हीच खरी राष्ट्राची सेवा असुन अशा प्रकारे सेवा करणारेच या सन्मानाचे खरे हक्कदार आहेत .येथुनपुढे अशाच प्रकारे नविन उपक्रमांना चालना देण्यात असे शाळेचे मुख्याध्यापक अजय वाघ यांनी सांगितले .
