इतर

प्रा. सखाराम घावटे व श्री. बाळासाहेब जाधव यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न.


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. सखाराम घावटे तसेच माध्यमिक विद्यालयातील शिक्षक श्री. बाळासाहेब जाधव हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्यामुळे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह व आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव यांच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा शेवगाव येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प.गणेश महाराज डोंगरे हे होते तर कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष मा.अॅड.डॉ. विद्याधर काकडे, जि.प.सदस्या सौ. हर्षदाताई काकडे, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मण बिटाळ, श्रीम.वंदना पुजारी, प्राचार्य श्री. संजय चेमटे, उपप्राचार्या श्रीम. रूपा खेडकर, उपमुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी भालसिंग, पर्यवेक्षिका श्रीम. पुष्पलता गरुड, पर्यवेक्षक श्री. लक्ष्मण गाडे, श्री. शिवाजी पोटभरे , अॅड.श्री.अविनाश मगरे, श्री. गहिनीनाथ कातकडे, संस्थेच्या विविध विद्यालयाचे आजी-माजी प्राचार्य आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अॅड.डॉ. काकडे यांनी दोंन्ही सत्कारमूर्तींना भावी आनंदी व आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यातही त्यांनी शाळा, विद्यार्थी व समाज यांच्या प्रति बांधिलकी जपावी असे आवाहन केले.प्रा.सखाराम घावटे यांनी मराठी विषय व श्री.बाळासाहेब जाधव यांनी गणित विषय अत्यंत आवडीने, सोप्या पद्धतीने शिकवला असे ते म्हणाले.
सौ.काकडे म्हणाल्या की, प्रा. सखाराम घावटे व श्री. बाळासाहेब जाधव यांनी शाळेला, आपल्या कामाला ,सर्वाधिक प्राधान्य दिले. भविष्यात दोघांनीही आपल्या कुटुंबाला व समाजाला वेळ द्यावा असे त्या म्हणाल्या व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती प्रा. सखाराम घावटे म्हणाले की अॅड. डॉ. विद्याधर काकडे साहेब व सौ.हर्षदाताई काकडे यांच्यामुळे माझ्या जीवनाचे सोने झाले.
सदर कार्यक्रम प्रसंगी दोन्ही सत्कार मूर्तींचे कुटुंबीय, मित्र,नातेवाईक, ग्रामस्थ तसेच शेवगाव तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी उभयतांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री. संजय चेमटे यांनी सूत्रसंचालन श्रीम. जरीना शेख , श्री भाऊसाहेब गायकवाड यांनी तर आभार उपप्राचार्या श्रीम. रूपा खेडकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button