राजूर मध्ये सह्याद्री मेडिकल व आईजी हॉस्पिटल सेवेचा पिचड लहामटे यांचे हस्ते शुभारंभ

राजूर प्रतिनिधी
राजूर मध्ये सह्याद्री मेडिकल व आईजी हॉस्पिटल या आरोग्य सेवेचा शुभारंभ माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांचे शुभहस्ते करण्यात आला

आदिवासी जनतेच्या सेवेसाठी प्रथमच राजूर तालुका अकोले येथे डॉ.रामनाथ मुठे व डॉ.सुरेखा मुठे आणि ऐश्वर्या सचिन अढारी यांच्या प्रयत्नातून हे आरोग्य केंद्र उभे राहत आहे. सदर उद्घाटन प्रसंगी मा.मंत्री मधुकररावजी पिचड आमदार डॉ. किरण लहामटे, मा. आमदार वैभवराव पिचड ,युवा नेते सतिष भांगरे , युवा नेते लाकिभाऊ जाधव , आदिवासी सेवक मंगलदास भवारी , तळेरान चे सरपंच गोविंद साबळे, सी.बी.भांगरे , गणपतराव देशमुख , दत्तू भोईर ,सुरेश कानकाटे किरण माळवे, कोंडार महाराज,शेख साहेब (राजूर पोलीस), डी. एम. भांडकोळी , सचिन मुंढे ( उद्योजक), निंबा रोंगटे , मारुती मेचकर ,भिवा भांडकोळी ,विनायक अढारी, संतोष घिगे , बाळू घिगे. हे सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मा.मंत्री मधुकराव पिचड यांनी फित कापून कार्यक्रमाचा शुभारंभ केला व आपल्या भाषणात त्यांनी आदिवासी मुले आश्रम शाळेमध्ये शिकून उच्च शिक्षण घेत आहेत. व डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी होत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. सर्वांनी तालुक्याच्या जनतेसाठी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे मुंबई कोकण अध्यक्ष रामनाथ भोजने यांनी प्रास्तविक केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन भास्कर यलमामे यांनी केले अभिषेक भोजने व विशाल अढारी यांनी उपस्थितांचे आभार मानले
