पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आघाडीचा झेंडा विखेंच्या जनसेवेचा दारुण पराभव!

खा.विखे यांना मोठा धक्का !
विरोधी भाजपच्या जनसेवा पॅनलचा धुव्वा
१८ पैकी १८ जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात !
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात ठेवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा यश आले असून या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचा झेंडा पुन्हा फडकला आहे. या बाजार समितीची साठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या शेतकरी विकास पॅनल तर भाजप प्रणित जनसेवा पॅनल मध्ये सरळ सरळ लढत झाली होती. या बाजार समितीचे नोकरी १८ जागांवर महाविकास आघाडीने माजी मारली असून या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीमध्ये बाजार समितीचे विद्यमान सभापती प्रशांत संभाजीराव गायकवाड यांना ८१४ एक नंबरची मते मिळाली आहे . तर या निवडणुकीत भाजपला साधे खोलता न आल्याने सुजय विखे पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी ९८ टक्के मतदान झाले असून पारनेर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी ९.१५ ला मतमोजणी सुरू केली आहे.शुक्रवारी या निवडणुकीत ३ हजार १३० पैकी ३०७७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.यामध्ये प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सेवा संस्था मतदारसंघातील ११ जागांसाठी १ हजार ३४० पैकी १ हजार ३२० मतदान तर ग्रामपंचायत मतदार संघातील ४ जागांसाठी १ हजार ५२ पैकी १ हजार ३९ मतदान तर व्यापारी मतदारसंघातील २ जागांसाठी ५७६ पैकी ५६४ हमालमापाडी १६२ पैकी १५४ मतदान झाले असून मतदार राजाने या निवडणुकीत आमदार निलेश लंके यांच्या महाविकास आघाडीला कौल दिला आहे.
या बाजार समितीची निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके शिवसेनेचे माजी आमदार विजयराव औटी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले तर भाजप पुरस्कृत जनसेवा पॅनलचे नेतृत्व खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह सुजित झावरे भाजप कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष सुनील थोरात वसंतराव चेडे माझी सभापती बाबाजी तांबे गणेश शेळके डॉ भाऊसाहेब खिलारी यांनी केले आहे. मतदार राजांनी दिलेला कौल आम्हाला मान्य असून या निवडणुकीत बहुतांशी उमेदवारांना चांगली मते मिळाली आहे त्यामुळे मतदारांची आभार मानतो अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी व्यक्त केली आहे.
– भाजप प्रणित जनसेवा सहकारी पॅनलचे उमेदवार.. ( चिन्ह – कपबशी)
*सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून सुरेश ज्ञानदेव पठारे,४८०; दिलीप ज्ञानदेव मदगे, स्वप्निल सुरेश मावळे, ४६० गंगाधर भानुदास रोहकले, ४४९अरुण रामभाऊ ठाणगे ५३१ संतोष मारुती आंधळे ५०९ प्रकाश कोंडीबा ठाणगे ४४२ संध्या कल्याण काळे ४६३ सीताबाई महादु गायकवाड,४५४ इतर मागास प्रवर्ग रामदास सावळेराम रसाळ ४८२ स्वप्निल नामदेव राहींज ५१९
*ग्रामपंचायत मतदार संघातून लहू रामदास भालेकर, शिवाजी सिताराम खिलारी.. पंकज अशोक कारखिले ५०३ अनुसूचित जाती व जमाती अमोल सुखदेव साळवे ४०२
व्यापारी मतदारसंघातून अशोक फुलाजी चेडे २९६
दत्तू सावित्रा पुजारी ९६
*हमाल मापाडीमधून संदीप सुभाष कावरे ५१