आजचे पंचांग व राशिभविष्य दि.३०/०४/२०२३

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १० शके १९४५
दिनांक :- ३०/०४/२०२३,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४९,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति २०:२९,
नक्षत्र :- मघा समाप्ति १५:३०,
योग :- वृद्धि समाप्ति ११:१६,
करण :- तैतिल समाप्ति ०७:२९,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- मेष – भरणी,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- वृषभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:१३ ते ०६:४९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:१५ ते १०:५१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५१ ते १२:२७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०२ ते ०३:३८ पर्यंत,
❀ दिन विशेष:
यमघंट १५:३० प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १० शके १९४५
दिनांक = ३०/०४/२०२३
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुमच्या व्यवसायात काही नवीन काम होऊ शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांबरोबर चांगला वेळ घालवाल, सर्वजण त्यांचे सुख-दु:ख शेअर करताना दिसतील आणि पैसे कसे वाचवायचे हे वरिष्ठांकडून शिकून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. राजकीय लाभ होईल. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. कोणतीही अडचण आल्यास चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. तुमचं प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस विशेष यशाचा आहे. परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्रात वाढ होईल. मित्राच्या मदतीने तुमचं उत्पन्न वाढू शकते. व्यवसायाची स्थिती सुधारेल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्हाला तुमच्या मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. मित्रांबरोबर कुठेतरी बाहेर जाण्याचाही बेत असेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामावर सर्वजण खूश होतील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जे तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात मदत करेल. जे लोक वडिलोपार्जित व्यवसाय करतात, ते आपल्या व्यवसायात काही बदलांसाठी आपल्या वडिलांशी बोलतील. व्यवसाय करणारे लोक नवीन व्यावसायिक प्रकल्पाकडे वाटचाल करू शकतात. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही कौटुंबिक भल्यासाठी काम करताना दिसाल, पण नातेवाईकांच्या बोलण्यावरून तुम्ही वादात पडू शकता, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित जो त्रास सुरू होता, तो आज संपेल. उत्पन्नात वाढ होईल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करतील. खेळ खेळणे आणि मैदानी खेळांमुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. तुमच्या वडिलांच्या सल्ल्याने तुम्हाला कामाच्या ठिकाणी पैसे मिळू शकतात. कुटुंबातील कोणत्याही महिला सदस्याचे आरोग्य तुमच्या चिंतेचे कारण बनू शकते. आजचा दिवस तुमचा चांगला असेल पण काहीसा तणावाचा देखील असेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी मित्रांची मदत घेतील. वडील तुमच्या व्यवसायात काही पैसे खर्च करतील. जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे काही दिर्घकालीन आजाराने त्रस्त होते, त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा दिसेल. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही नवीन लोकांच्या संपर्कात याल ज्याद्वारे तुम्हाला नफा मिळून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांच्या मदतीने आर्थिक अडचणी दूर होतील. दूर राहणारे काही नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधू शकतात. तुमच्या कोणत्याही वाईट सवयीमुळे तुमच्या प्रियकराला वाईट वाटू शकते आणि तो तुमच्यावर रागावू शकतो. आपल्या प्रियजनांची काळजी घेणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांची काळजी घेत असताना, आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्या. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठ आणि कनिष्ठांचेही सहकार्य मिळेल. तुमच्या वाणीतील गोडव्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील. आकस्मिक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. व्यवसाय मजबूत करण्यासाठी तुम्ही कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता, ज्यासाठी तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला आर्थिक मदत करेल. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. प्रत्येकजण खूप मजा करताना दिसणार आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश कराल, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुम्ही तुमची रखडलेली कामेही पूर्ण करा आणि इतरांना मदत करा. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत असाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. क्रीडा स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना विजय मिळेल. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांची मदत घेऊ शकता. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीद्वारे तुम्हाला नवीन संपर्क मिळतील, त्यातून नफा मिळवून तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. चांगल्या आयुष्यासाठी तुमचे आरोग्य आणि व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. आज अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय असे कोणतेही काम करू नका, ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होईल. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि त्यामुळे तुम्हाला उद्या दिवसभर उत्साही वाटेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुमच्या मनाची कोणतीही इच्छा आज पूर्ण होऊ शकते. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. अधिका-यांकडून शुभवार्ता ऐकायला मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. नको असलेले विचार मनातून काढून टाका. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. शारीरिक व्यायामाला महत्त्व द्या. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या घरगुती कामांच्या बाबतीत दिवस चांगला आहे. तुमच्या जोडीदारासोबतचा आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात रोमँटिक दिवसांपैकी एक असू शकतो. चांगले मित्र तुमची साथ कधीच सोडणार नाहीत, ही गोष्ट तुम्हाला आज समजेल.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना आपल्या नोकरीत बदल बघायला मिळतील. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. तसेच, घरातील ज्येष्ठ सदस्यांबरोबर बसून तुम्हाला पैशांची बचत कशी करायची? पैसे कसे गुंतवायचे? हे समजून घ्या. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. जे आजवर विनाकारण पैसे खर्च करत होते, त्यांनी उद्या स्वतःवर नियंत्रण ठेवावे आणि पैसा वाचवावा. आज तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत अशा गोष्टी करा, ज्याबद्दल तुम्ही अनेकदा विचार करत होतात.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण तुम्ही हिंमत हारू नका आणि तुमच्या चुकांवर काम करा, मेहनत घ्या आणि या अपयशांचा सामना करून तुमची प्रगती करा. अडचणीच्या काळात नातेवाईकही कामी येतील. आजचा तुमचा संपूर्ण दिवस व्यस्त असेल. पण, तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या तुमच्या मित्रांपासून दूर राहा.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आज तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास आहे याचा योग्य वापर करा. आज दिवसभर तुम्ही उत्साही राहाल. आज तुमच्याकडे पैसे उधार घ्यायला कोणीतरी येऊ शकतं पण कर्ज देण्यापूर्वी त्या व्यक्तीची विश्वासार्हता तपासा नाहीतर तुमचे पैसे रखडले जाऊ शकतात. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. आज तुमचे कुटुंबीय तुमच्याबरोबर अनेक समस्या शेअर करतील. तुम्ही त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्या. गरजूंना मदत करून तुम्हाला मानसिक शांतता मिळेल तसेच प्रसन्न वाटेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतात. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करणार असाल तर आजचा शुभ दिवस आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळू शकतो. मित्रांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमचा कोणताही निष्काळजीपणा आज तुम्हाला महागात पडू शकतो त्यामुळे काळजी घ्या. लक्षपूर्वक काम करा. तुमच्या आरोग्याबाबत अधिक काळजी घेणं आवश्यक आहे त्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज संध्याकाळी स्वत:ला वेळ देण्यासाठी घराबाहेर पडा. पण, तुम्ही एकटे असलात तरी तुमचं मन शांत नसणार. मनात असंख्य विचार सुरु असतील. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. मुलाला चांगली नोकरी मिळाल्याने पालकांना खूप आनंद होईल. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले पैसेही आज तुम्हाला परत मिळतील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर