महाराष्ट्र

शक्ती प्रदर्शन की नव्या समीकरणांची नांदी? शरद पवारांच्या गुगली चा नेमका अर्थ काय?

मुंबई दि २

‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा आज राजीनामा दिला आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात मोठे फेरबदल बघायला मिळत आहेत. आजच लोक माझे सांगाती या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईतल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपल्या पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षीच शरद पवार यांची निवड अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा करण्यात आली होती. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागील २४ वर्षांपासून अध्यक्ष आहेत. मात्र आज त्यांनी हे पद सोडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं अध्यक्षपद कुणाकडे जाणार? याचीही चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं सांगितलं. अशात आता शरद पवार यांनी घेतलेला निर्णय हा विविध अर्थ विशद करणारा आहे.शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर नेमके कुठले प्रश्न उपस्थित होत आहेत?

शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर मुख्य प्रश्न हा उपस्थित होतो आहे की त्यांनी हा राजीनामा नेमका का दिला? शरद पवारांनी राजीनामा देऊन युतीचे नवे संकेत दिले आहेत का? शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीचं नुकसान होणार का?

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला नाही तर?

शरद पवारांनी जर राजीनामा मागे घेतला नाही तर अध्यक्ष कोण होणार हादेखील एक मुख्य प्रश्न आहे. सध्या चर्चा अशी सुरू आहे की ज्या प्रमाणे सोनिया गांधी या पडद्यामागे राहून काँग्रेसच्या हायकमांड म्हणून काम करत आहेत अगदी तशाच पद्धतीने शरद पवार काम करणार आहेत अशाही चर्चा आहेत. शरद पवार हे मागच्या साठ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी राजीनामा मागे घेतला नाही तर पुढचा अध्यक्ष कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याबाबतचा निर्णय समिती घेईल असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन मुंबईत होतं. त्यावेळी शरद पवार म्हणाले की मी मागच्या सहा दशकांपासून राजकारणात सक्रिय आहे. मला महाराष्ट्राने खूप प्रेम दिलं आहे. सध्या आपला पक्ष ज्या दिशेने जातो आहे त्यावरून मला वाटतं आहे की आता नव्या पिढीला मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मी आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतो आहे. मी सार्वजनिक आयुष्यातून निवृत्ती घेत नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देतो आहे असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवारांच्या राजीनाम्याचा अर्थ काय?

१) अजित पवार यांच्याविषयी उलटसुलट चर्चा सुरु आहेत. अशात अशा चर्चा सुरु झाल्या आहेत की पक्षाचं अध्यक्षपद हे सुप्रिया सुळेंना दिलं जाईल. शरद पवार यांच्या कुटुंबात कलह होऊ नये म्हणूनच त्यांनी हे पद सोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते आहे.

२) एका मुलाखतीत नुकतंच अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायला आवडेल अगदी आत्ताही असं म्हटलं होतं. तसंच यासाठी २०२४ ची वाट कशाला बघायची? असंही अजित पवार म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवल्या गेल्या. असंही म्हटलं गेलं की अजित पवार यांना बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट होईल. ही फूट रोखण्यासाठीही शरद पवारांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे. २०२४ ला नवी समीकरणं बांधण्याची ही नांदी आहे असंही म्हटलं जातं आहे.

३) शरद पवारांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडल्यानंतर जो नवा अध्यक्ष होईल त्याच्यावर महाविकास आघाडी सांभालून पुढे नेण्याची जबाबदारी असेल.

४) शरद पवार मागच्या वर्षीच पक्षाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा निवडले गेले आहेत. त्यावेळी अजित पवार या ठिकाणाहून निघून गेले होते. त्यांनी अचानक पद सोडलं आहे याचा अर्थ असा असू शकतो की काहीतरी गंभीर घडलं आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असू शकतं. त्यामुळेही त्यांनी राजीनामा दिला असू शकतो.

५) शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते. मात्र ते स्वतःच असा काहीतरी निर्णय घेतील हे सगळ्यांसाठीच अनपेक्षित होतं. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडणं राजकीय अर्थ असू शकतात. ते जो नवा अध्यक्ष नेमतील त्याचे निर्णय आणि त्याची जबाबदारी ही पूर्णपणे त्या नव्या अध्यक्षावर असेल. ही जबाबदारी नव्या अध्यक्षांना शरद पवारांवर ढकलता येणार नाही.

६) शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ही खेळी शरद पवार यांनी केल्याचीही चर्चा होते आहे. शरद पवारांनी आज पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शरद पवारांनी हा संदेश पक्षात दिला आहे की जे आपल्याला विरोध करत आहेत त्यांना शरद पवारांनी आज आपण काय करु शकतो हे दाखवून दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button