शरद पवार यांची निवृत्तीच्या घोषणा! राजकीय वर्तुळात खळबळ!

मुंबई प्रतिनिधी:
– माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि महाराष्ट्रातील एक मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख असणारे जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज ( दि2 )मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली त्यांच्या या घोषणेने राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी स्वतः केल्याने महाराष्ट्रात राजकारणात मोठे संशयाचे वादळ उठले आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला असून निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत सभागृह सोडणार नाही असे म्हणत राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक आणि भावुक झाले. यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाचा सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभागृहाला मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. याला कार्यकर्त्यांसह नेत्यांनीही विरोध केला सभागृहात भावूक वातावरण निर्माण झाले. यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनी थेट शरद पवारांचे पाय धरत निर्णय मागे घेण्याची मागणी केली.
56 वर्ष सत्तेच्या राजकारकामध्ये माझा सहभाग राहिला. आता मी निवडणुकीला उभा राहणार नाही. आता राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नावर अधिक लक्ष घालण्यावर माझा भर राहणार आहे. याशिवाय मी कोणतीही दुसरी अन्य जबाबदारी घेणार नाही. 1 मे 1960 ते 1 मे 2023 या प्रदीर्घ काळानंतर कुठेतरी थांबायचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतला आहे, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या घोषणेने महाराष्ट्रात नव्हे तर भारतात खळबळ उडाली आहे. तरी कार्यकर्त्यांनी आपली निवृत्ती मागे घ्यावी या मागणीला जोर धरत आहे. शरद पवारांच्या राजीनामे या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर राजीनामा मागे घेण्याचा सूर व्यक्त केला जात असून नवा अध्यक्ष कोण असेल राष्ट्रवादीचे पुढील भवितव्य काय असेल राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतील या सर्व गोष्टींचा तर्कवितर्क लावले जात आहेत