दिव्याऺग विद्यार्थ्यांसाठी टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा चे आयोजन!
रोटरी क्लब ऑफ नासिक चा उपक्रम
नाशिक प्रतिनिधी
रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या अंतर्गत रोटरी एनक्लेव द्वारे रोटरी इंटरॅक्ट सप्ताहात १५ फेब्रुवारी २०२२ ते २३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान नाशिक मधील अनेक शाळेत प्रस्थापित इंटरॅक्ट क्लबनी शाळेतीलच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत
, त्यातील चौथ्या दिवशी म्हणजेच १८ फेब्रुवारी २०२२ चे खास आकर्षण होते ते विशेष सक्षम मुलामुलींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी टाकाऊ पासून टिकावू वस्तू बनविण्याची स्पर्धा , या विशेष सक्षम मुलामुलींने आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या तसेच कल्पनाशक्तीच्या जोरावर थक्क करतील अश्या अनेकविध उपयोगी वस्तू बनविल्या ज्यासाठी त्यांनी टाकाऊ वस्तूच वापरल्या आणि टाकाऊ वस्तूचे रिसायकलिंग ( पुनर्वापर ) कसे करावे याचे सप्रात्यक्षिक उदाहरण दिले. या विशेष सक्षम मुलामुलींचा उत्साह आणि आत्मविश्वास थक्क करणारा होता , ते इतरांपेक्षा कुठल्याही बाबतीत मागे नाही हेच त्यांच्या कलेतून स्पष्ट होत होते. या मुलामुलींना योग्य वेळेस योग्य मार्गदर्शन मिळाले तर भविष्यात त्यांच्या हातून मोठी कामगिरी घडू शकते यात शंकाच नाही. या स्पर्धेत कर्णबधिर मुलामुलींच्या गटात पडसाद शाळेचा जोएल फाजगे यास प्रथम क्रमांकाचा बहूमान मिळाला तर त्याच शाळेतील आकाश हाडस यास द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला , पडसाद शाळेतीलच करण चौधरी व माई लेले शाळेतील अनिकेत निकुंभ या दोघांना उतेजनार्थ बक्षीस मिळाले. बौद्धिक अपंगत्व गटामध्ये मोहित पांचाळ ,अहमद जुनैद शेख ,जय गांगुर्डे , स्नेहा पाटील , आकाश पगारे यांना बक्षिसे देण्यात आली. बौद्धिक गटातील सर्व स्पर्धकांना विशेष सहभगासाठी रोटरी क्लब ऑफ नासिक चे माजी अध्यक्ष मनीष चिंधडे यांच्या आर्थिक मदतीतून बक्षिसे देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रमेश मेहेर यांची आवर्जून उपस्थिती होती. त्यांनी या मुलामुलींच्या तयार केलेल्या वस्तूच्या स्टॉल्सला भेट दिली , या वस्तू कश्याप्रकारे केल्या ,कल्पना कशी सुचली , कोणत्या टाकाऊ वस्तूचा वापर त्यांनी केला याची संपूर्ण माहिती प्रांतपालानी या मुलामुली कडून घेतली , त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले आणि कार्यक्रमातील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी भेटवस्तू म्हणून चित्रकलेचे किट दिले. या कार्यक्रमाचे यजमानपद इंटरॅक्ट क्लब ऑफ अशोका , अर्जुन नगर याचे कडे होते. रोटरी क्लब ऑफ नासिक ने कार्यक्रम व स्पर्धचे आयोजन केले होते. रोटरी क्लब ऑफ नासिक च्या अध्यक्षा डॉ श्रीया कुलकर्णी , मूग्धा लेले , मंगेश अपशंकर , विनायक देवधर , असिस्टंट गव्हर्नर अनिल सुकेणकर , असिस्टंट गव्हर्नर पवार सर आणि नाशिक शहरातील सर्व रोटरी क्लबचे अनेक सभासद कार्यक्रमास उपस्थित होते. रोटे सुचेता महादेवकर यांनी संपूर्ण स्पर्धेचे नियोजन केले तसेच सूत्रसंचालन हि केले ,इंटरॅक्ट क्लब च्या डायरेक्टर अदिती अग्रवाल आणि कीर्ती टाक यांनी विशेष परिश्रम घेतले.